सय्यद रमजान अली महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित.
चंद्रपूर(का.प्र.): चंद्रपूर जिल्ह्यातील नामांकित पत्रकार तथा साप्ताहिक कलम मांगे इन्साफ चे मुख्य संपादक सय्यद रमजान अली यांना परभणी येथील जय हिंद सेवाभावी संस्थांच्या वतीने 11 मे 2025 रोजी महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम खासदार संजय जाधव, यांच्या अध्यक्षतेखाली औषधी भवन वकील कॉलनी परभणी येथे घेण्यात आला असून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 25 मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक सत्तार इनामदार, इंजिनीयर आर.डी. मगर, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, गफार मास्टर, खदिरलाला हाशमी, हाजी शरीफ सह अन्य मान्यवर मंचावर विराजमान होते.
सय्यद रमजान अली यांना हा पुरस्कार पत्रकारितेच्या क्षेत्रात मागील अनेक दशकापासून उल्लेखनीय व सक्रियरिता कार्य करीत असल्याने तसेच जनतेचे प्रश्न शासन दरबारी आपल्या लेखणीच्या माध्यमातून लावून धरत असल्याने त्यांनी केलेल्या कार्याची पावती म्हणूनच हा पुरस्कार देण्यात आला असल्याचे मनोगत याप्रसंगी आयोजक मान्यवरांनी व्यक्त केले. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्रातील अनेक पत्रकारांनी व सामाजिक संघटनेनी शुभेच्छा देत अली यांचे अभिनंदन केले आहे, हे मात्र विशेष!
या कार्यक्रमाचे संचालन मुकुंद नंद व आभार प्रदर्शन शफिक चारठाणकर यांनी केले.
