प्रतिनिधी सारंग महाजन.
कुसुंबा तालुका जिल्हा धुळे येथील कूणाल शिंदे शिक्षणानिमित्त धुळे
येथे स्थायिक.. बालमंदिर ते बारावी शिक्षण जयहिंद हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज धुळे येथे झाले असून नाट्यशास्त्र पदविका प्राप्त ( ललितकला नाशिक 2021) तसेच संगणक अभियंता (2024)
SSVPS Engineering College Dhule इथे झाले आहे.
कुणाल शिंदे यांचे आई वडिल दोन्ही उच्चशिक्षित.. आईच्या वडिलांकडून (आजोबा) वाचनाची आवड..वडिल शिरूड येथील कलिका माता विद्या प्रसारक संस्था येथे पर्यवेक्षक म्हणून काम पाहतात.. आई देघील उच्च शिक्षित होत्या.. इंजिनिअरिंगला असताना मातृछत्र हरपले . कुणाल शिंदे यांना लहानपनासून नाटकाची आवड.. लहानपणी गणेशोत्सव, शाळेतील नाटकांनी हा अभिनयातला प्रवास सुरू झाला. शिक्षणासोबतच कलेची आवड जोपासत हौशी राज्य नाट्य, एकांकिका स्पर्धा, पुरुषोत्तम- सूर्यकांता करंडक ,एकपात्री नाट्य स्पर्धा, पथनाट्य , जिभाऊ करंडक ( पुरुष अभिनय प्रथम पारितोषिक विजेता),s-factor, इंटरनेट बाप्पा, नमुन्यांचे लग्न, कात, प्रतिकार तसेच व्यवसायिक नाटकात सहभाग, विविध पारितोषिक . तंगा मंगा ना दंगा या नाटकात या अहिराणी नाटकात धुडक्या हि मध्यवर्तीय भूमिका साकारल.आदिशक्ती ( सन- मराठी),सावली होईन सुखाची (सन-मराठी),लक्ष्मी निवास- (झी मराठी), तु हि रे माझा मितवा( स्टार प्रवाह),
लक्ष्मी च्या पावलांनी ( स्टार प्रवाह), याड लागलं प्रेमाच ( स्टार प्रवाह),घरोघरी मातीच्या चुली ( स्टार प्रवाह),नवी जन्मेन मी (सन मराठी), पिंगा ग पोरी पिंगा (कलर्स मराठी),लय आवडतेस तु मला ( कलर्स मराठी) या टीव्ही सिरीयल मध्ये काम केले आहे.शिवपुत्र संभाजी,शिवशाही या दोन महानाट्य मध्ये काम केले. आहे.टाइमपास-3, दि. इंडियन स्टोरी, कलयुगतील मुलगी , “ऑलराऊंडर “मराठी लघु चित्रपट, “मामा तुमनी पोर से बघतीस भारी” अहिराणी सॉंग,
” स्वाहा नही आहा” मराठी लघु चित्रपट,
“Happy women’s day” राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लघु चित्रपट,”ताई मी कलेक्टर व्हयनू” वेबसीरिज लीड रोल संग्राम पाटील, “आयुष्याचा फुल स्टॉप ” लघु चित्रपट इत्यादी कलाक्षेत्रात कामे केले असून कामाबद्दल नातेवाईक मित्रमंडळी कडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
