राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल कृषी अधिकारी बोराळे यांचा ‘स्नेहबंध’तर्फे गौरव.
प्रतिनिधी- सारंग महाजन.
अहिल्यानगर | ‘प्रधानमंत्री सूक्ष्मअन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत प्रतिलाभार्थी अनुदान वितरणात अहिल्यानगर जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला. यानिमित्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांचा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी गौऱव केला. याबद्दल स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बोराळे यांचा शाल व रोप देऊन गौरव केला. यावेळी कृषी उपअधीक्षक सागर गायकवाड उपस्थित होते.
डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, जिल्ह्यात या योजनेंतर्गत यावर्षी ५०१ अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करण्यात आले. तर तीन वर्षात ही संख्या १४३५ वर पोहोचली. या कार्याची दखल घेत शासनाने बोराळे यांना सन्मानित केले. यानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव राज्याच्या नकाशावर कोरले आहे.
(फोटो ओळ)
‘राज्यस्तरीय पुरस्कार’ मिळाल्याबद्दल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांचा ‘स्नेहबंध’चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी गौरव केला. समवेत कृषी उपअधीक्षक सागर गायकवाड.
