प्रशासनाला कधी जाग येणार?
प्रतिनिधी: गोपाळ भालेराव
कात्रज (पुणे):10मे 2025 शनिवार रोजी कात्रज येथे सायंकाळी 6:30 च्या सुमारास दुगड बिल्डिंग शेजारील ओढ्यात 5 वर्षाचा मुलगा पाण्यात पडला आणि …अमोलदादा चव्हाण यांच्या मालती – माधव बिल्डिंग पर्यंत वाहुन गेला होता … स्थानिक नागरिकांनी शोध घेऊन त्याला बाहेर काढण्यास मदत केली आणि त्याचा जीव वाचला ओढ्याला कमी पाणी असल्यामुळे आणि केवळ मुलाचे दैव बलवत्तर म्हणुन आज तो मुलगा वाचला आणि चालत मागे येऊ शकला.
फक्त काही वाईट घटना घडल्यावरच उपाययोजना करायच्या का? अर्ध्या पेक्षा जास्ती ओढ्यावर स्लॅब टाकण्यात आला आहे … आमची कैक वर्षांपासून पुणे महानगरपालिका कडे मागणी आहे सदर ओढ्यावर स्लॅब असून… कृपया लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांनी सदर घटनेची नोंद घेऊन त्वरित निर्णय घ्यावा ही नम्र विनंती. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सत्या फाउंडेशनच्या अध्यक्षा गीतांजली गोरखनाथ जाधव आणि स्थानिक नागरिकांनी यांनी दिला आहे.
