प्रतिनिधी- सारंग महाजन | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज
नागपूर:महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेच्या (मॅग्मो )लीगल सेल च्या राज्य अध्यक्ष पदी डॉ तपसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मॅग्मो संघटना ही शासन मान्य संघटना असून सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी कार्य करत असते. डॉ तपसे यांना निवडीचे पत्र मॅग्मो संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ कन्नमवार सर, राज्य सरचिटणीस डॉ संतोष हिंडोळे सर ,राज्य मुख्य समन्व्यक डॉ निलेश टापरे सर ,कोषाध्यक्ष डॉ राजेंद्र पवार सर आणि प्रमुख मार्गदर्शक आदरणीय राजेश गायकवाड सरांनी दिले.
