ग्रामसेविका दिपाली हिरवे यांना तात्काळ निलंबित करा व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरूच राहणार
अहो जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेब तात्काळ न्याय द्या
संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी. पुणे
जळगांव सुपे गावातील ग्रामसेविका दिपाली हिरवे यांच्यावर गंभीर आरोप करत पत्रकार संघटनांनी तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे. सागर जगताप, कुमार जगताप, शरद जगताप व शुभम जगताप यांच्याविरोधात पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच त्यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी मागणी केली आहे.या सोबतच धमकी देणाऱ्या एका तोतया पोलीस कर्मचाऱ्याने 9322960610 या मोबाईल नंबरवरून धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला असून, त्याचा तपास करून त्याच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत कलम 5 आणि पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
ग्रामसेविका दिपाली हिरवे व तिचा तोतया पोलीस मित्र यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत संबंधित पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. तसेच आंदोलकांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे, तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी तातडीने गंभीर दखल घ्यावी आणि न्याय मिळवून द्यावा…!
