SYJC 2024-25 काळाचौकीत राज क्लासेसचा पुन्हा एकदा १००% निकाल
प्रतिनिधी किशोर गुडेकर
मुंबई ( काळाचौकी ) येथील राज क्लासेसने आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखत यंदाही १००% निकाल मिळवण्याचा विक्रम केला आहे. यावर्षी एकूण २४५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते आणि सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
संस्थेचे प्रमुख सीए राजू औटी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षकवर्ग, पालक आणि विद्यार्थ्यांचे परिश्रम आणि समर्पण यामुळेच हे यश शक्य झाले, असे त्यांनी सांगितले.
या विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळवत संस्था व पालकांचे नाव उज्वल केले आहे. क्लासेसच्या टॉप 5 गुणवंत विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे:
१. पवनी आतळे (र. आ. पोद्दार कॉलेज ) ९३.६७%
२. कर्तिकी वामन ( लाला लाजपत राय कॉलेज ) ९३.५०%
३. राज कदम ( एस.आय. इ एस.कॉलेज ) ९२.८३%
४. साईश तांदेल ( एम. डी. कॉलेज ) ९०.१७%
५. मीनल कोयंडे ( रूपारेल कॉलेज ) ९०.००%
या यशाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हे उत्तम निकाल राज क्लासेसच्या शिक्षणपद्धती आणि मार्गदर्शनाची साक्ष देतात.
राज क्लासेसने विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यासक्रम, टेस्ट सिरीज आणि वैयक्तिक मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावला आहे.
याशिवाय 80% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या 60 हून अधिक विद्यार्थ्यांनी या यशात भर घातली.
राज क्लासेसकडून सर्व विद्यार्थ्यांचे पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!
“शिक्षण हे केवळ गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे,” असे सीए राजू औटी यांनी सांगितले.
