सनराइज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक सचिव श्री अंकुश गाजरे यांचा वाढदिवस साजरा.
प्रतिनिधी सारंग महाजन
मऊ मेनाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥1॥
मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जें जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥
भले तरि देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे काठी देऊं माथा!!2!!
मायबापाहून बहू मायावंत ! करू घातपात शत्रूहुनी..!!3!!
तुका म्हणे आम्ही अवघेची गोड! पुरविसी कोड त्याच परी!!4!!
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वरील ओळी प्रत्यक्षात जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे बंधू मित्र अंकुश सर…
कधी मेनाहून मऊ, कधी वज्राहून कठीन,कधी आई बापाहून मायाळू असा स्वभाव असणारे,आपलं काहीही झालं तरी चालेल,मात्र माणसं जपणार व्यक्तिमत्व म्हणजे अंकुश गाजरे सर,अठराविश्व दारिद्र्य भोगून परिस्थितीशी दोन हात करत,अतिशय प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवणारे व्यक्तिमत्व,संघर्ष काय असतो हे ज्याच्याकडून शिकावं आणि संघर्षातून स्वतःच साम्राज्य कसं घडवावं,याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अंकुश गाजरे सर, शून्यातून स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असताना अनेकांना हातात हात देऊन उभा करणार एक सहृदयी आणि परोपकारी व्यक्तिमत्व म्हणजे अंकुश गाजरे सर, आमचे बंधू मित्र आवाजाचा बादशहा, उत्कृष्ट समालोचक, सूत्रसंचालक युवा ग्रामीण साहित्यिक, सुप्रसिद्ध युट्युबर तसेच सनराइज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे संस्थापक सचिव अंकुश गाजरे सर यांचा आज जन्मदिवस,,सरांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सनराइज परिवाराच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा सरांना निरामय, निरोगी उदंड आयुष्य लाभो त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना
