अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकांची वाळू माफियांवर विरोधांत कारवाई,
कारवाईचा दणका सुरूच,
संभाजी पुरीगोसावी (वर्धा जिल्हा) प्रतिनिधी.
वर्धा जिल्हा पोलीस दलातील उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकांतील पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे ,पोलीस नाईक रविन्द्र घाटुर्ले, पोलीस शिपाई राकेश इतवारे यांना मुखबीर हे पेट्रोलिंग करीत असताना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून की आरोपी नामे अजय लोभेश्वर दाते, (वय 31 वय) रा. निशानपुरा वॉर्ड, ता. हिंगणघाट ) हा मालक आरोपी राजू उपाध्ये,(रा. तेलिपुरा वॉर्ड, हिंगणघाट) याचा सांगणे वरून त्याच्या ताब्यातील विना क्रमांकाचा लाल रंगाच्या महिंद्रा कंपनी चा ट्रॅक्टर मध्ये विना परवाना नदीच्या पात्राचे बोरखेडे घाट येथून काळी रेती चोरून हिंगणघाट शहर कडे वाहतूक करीत आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस स्टाफ आणि पंच यांच्या मदतीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आरोपी व ट्रॅक्टर चालक यांस थांबवून चेक केले असता 1 ब्रास काडी रेती ( गौण खनिज) बिना रॉयल्टी वाहतूक करताना रंगेहाथ पकडण्यात आले आल्याने यावेळी जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून ट्रॅक्टर, ट्रॉली व 1 ब्रास काडी रेती (गौन खनिज ) असा जु कि 8,06,000/- रु.चा मुद्देमाल माल मिळून आल्याने पोलीस हिंगणघाट येथे आरोपींना विरूधांत गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सा. हिंगणघाट यांचे कार्यालयातील पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे, पोलीस नाईक रविन्द्र घाटुर्ले, पोलीस शिपाई राकेश इतवारे यांच्यासह आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
