मा. श्री. डॉ. आदित्य पतकराव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षवल्ली सेवाभावी संस्था व ओजल मायक्रो सर्विस फाउंडेशन तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन.
प्रतिनिधी सारंग महाजन.
मा.श्री. डॉ. आदित्य पतकराव साहेब
(भारत सरकार प्रादेशिक रेल्वे सल्लागार समिती सदस्य,नासा (NASA) स्पेस कॅम्प एज्युकेशन टूर प्रोजेक्ट डायरेक्टर )
यांच्या वाढदिवसानिमित्त
वृक्षवल्ली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि ओजल मायक्रो सर्विस फाउंडेशन तर्फे
मायेचा हात सोशल फाउंडेशन संचालक लिखित नाशिककर
कामशेत ता. मावळ, जि. पुणे
येथे अनाथ आश्रमास भेट देण्यात आली. अनाथ गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वृक्षवल्ली सेवाभावी संस्था व ओजल मायक्रो सर्विस फाउंडेशन यांच्यावतीने शालेय शैक्षणिक साहित्य,फळ वाटप,
आणि आरोग्य तपासणी शिबिर व औषधी वाटप करण्यात आले.
मायेचा हात फाउंडेशन यांच्या सत्कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या. डॉ आदित्य पतकराव साहेबांनी सर्व मित्रपरिवाराचे आभार व अभिनंदन व्यक्त केले
सोबत डॉ दत्ता तपसे, अमर शिंदे, विशाल कांदे, अमोल लोंढे, रमेश तपसे, रोहन आघाव, कार्तिक गायकवाड उपस्थित होते.
