१मे २०२५ महाराष्ट्र दीन कामगार दिन निम्मित आझाद रिक्षा संघटनेच्या वतीने ज्येष्ठ रिक्षा चालकांचा सन्मान कार्यक्रमात मधु तारा प्रमुख पाहुणे.
संपादकीय
दिनांक 1 मे 2025 रोजी आझाद रिक्षा चालक संघटना पुणे यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी ज्येष्ठ रिक्षा चालकांचा सन्मान त्यांच्या कुटुंबियांसमवेत स्मृती चिन्ह देऊन करण्यात आला.*
*संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शफीक भाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य असा ज्येष्ठ रिक्षा चालकांचा सन्मान सोहळा लष्कर येथील राणी लक्ष्मी बाई उद्यान पुणे येथे उत्साहात पार पडला.*
*या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री नितीनजी शिंदे.कोंढवा पोलिस वाहतूक उपनिरीक्षक श्री सोहेलजी इनामदार साहेब.बंडगार्डन वाहतूक पोलिस दीपमाला मॅडम. श्री महेबुब भाई पटेल.उपस्थित होते.*
*या प्रसंगी सर्व मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ रिक्षा चालकांना त्यांच्या कुटुंबासमवेत स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले.*
*या वेळी कोंढवा पोलीस* *उपनिरीक्षक श्री इनामदार साहेब.बंडगार्डन वाहतूक पोलिस दीपमाला मॅडम मधु तारा प्रमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्व रिक्षाचालक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले.*
*मधु तारा प्रमुखांनी रिक्षा चालक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अडीअडचणीला मधु तारा नेहमी तत्पर असेल असे आपल्या दिमाखदार भाषणात म्हटले तसेच मधु ताराच्या राज्यभर आरोग्य.दिव्यांग.रोजगार इत्यादी चालत असलेल्या कार्याची माहिती देत कविता आणि गाणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.*
*या वेळी श्री मधुकरजी यादव यांना उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.*
*या कार्यक्रमात वात्सल्य अनाथालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री मिलिंदजी सरोदे.दयावान सेवा भावी संस्थेचे प्रमुख श्री सिद्धेश्वरजी कवडे तसेच असंख्य मान्यवर उपस्थित होते.*
*अशा कार्यक्रमात येऊन विचारांची देवाण घेवाण होते तसेच समाजासाठी झटणाऱ्या लोकांची ओळख होते म्हणून या कार्यक्रमात सहभागी झाल्या बद्दल आपल्याला खूप समाधान मिळाले असे श्री इनामदार साहेब म्हणाले.*
*दीपमाला मॅडम यांनी ड्रिंक ड्राईव्ह केस मध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून कशा प्रकारे सामना केला याची माहिती देत श्री शफीक भाई पटेल यांच्या कार्याबद्दल कौतुक केले.*
*या कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी केले.*
*तसेच सर्वांचे आभार आझाद रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शफीक भाई पटेल यांनी मानले.*
*अत्यंत खेळामेळीच्या वातावरणात उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.
