प्रतिनिधी : शंकर जोग – अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन यांच्याकडे मागणी,
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या वतीने पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन यांच्या दालनामध्ये कामगारांच्या विविध प्रश्नांवर बैठक बोलावण्यात आली होती त्यांच्यासोबत पुणे महानगरपालिका मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे उपस्थित होते,
बैठकीमध्ये संघटनेचे प्रलंबित प्रश्न 2012 पासून होते त्यातील महत्त्वाचा मुद्दा उच्च न्यायालयाचा 2024 च्या निकालानुसार संघटनेचे 442 कर्मचारी कायमस्वरूपी कामावर घेण्यात यावे हा प्रश्न मांडला तसेच पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आलेल्या ग्रामपंचायत सेवकांचे शिक्षणाप्रमाणे पदोन्नती देण्यात यावी अशा अनेक विविध विषयांवर बैठक संपन्न झाली, यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन यांनी सांगितले पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा करून कामगारांचे प्रश्न सोडवण्यात येईल असे आश्वासन दिले, या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये उपायुक्त सामान्य प्रशासन प्रतिभा पाटील सफाई कामगारांचे प्रश्न न ऐकता बैठकीतून निघून गेल्या यावेळी संघटनेच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आला, त्यांना प्रशासन उपायुक्त पदावरून हटवण्यात यावे अशी तक्रार आयुक्तांकडे करणार आहे,
याप्रसंगी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष सतीश वसंत लालबिगे, संघटनेचे मुख्य संरक्षण डॉ सुधाकर पणीकर, प्रदेश अध्यक्ष रवी भिंगानिया, पुणे मनपा युनियन अध्यक्ष धर्मेंद्र सडेकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माने, मुख्य सचिव रवी बेंगळे, सचिव सूर्यकांत यादव, सहसचिव अंकुश म्हेञे, परविनताई लालबिगे, रत्नाताई काळे, प्राची खटावकर, बाबा गोणेवार, संजय भोसले, जयंत मोडक, अजित मापारे, तेजस्विनी सडेकर, आदि यावेळी उपस्थित होते
