प्रतिनिधी : दौलत सरवणकर : सिंधुदुर्ग स्थापना दिवस १ मे रोजी साजरा केला जातो. या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना झाली. प्रतिनिधी:- दौलत सरवणकर. सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना १ मे, इ.स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधीचे नाव दक्षिण रत्नागिरी जिल्हा होते, ते बदलून सिंधुदुर्ग ठेवण्यात आले. शिवाजी महाtराजांनी कुरटे बेटावर बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग ह्या जिल्ह्यात आहे. . १९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र सिंधुदुर्ग नगरी, ओरोस ब्रुद्रुक येथे आहे. सिंधुदुर्ग हा सागरतटीय जिल्हा आहे. कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अप्पासाहेब पटवर्धन यांचा आश्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीजवळ गोपुरी येथे आहे. सिंधुदुर्गात मालवणी बोली बोलली जाते.
पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त (३८) किल्ले असणारा तसेच सर्व प्रकारचे म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे.
