प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी – धाराशिव उपजिल्हाधिकारी म्हणून ज्योती पाटील यांनी स्वीकारला पदभार…! पाटील यांची पदोन्नतीने उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती, संभाजी पुरीगोसावी (धाराशिव जिल्हा ) प्रतिनिधी. महाराष्ट्र शासनाने मंगळवारी जाहीर केलेल्या उपजिल्हाधिकारी पदाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीत ज्योती पाटील यांची धाराशिवचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे, महाराष्ट्र शासनाचा महसूल व वने विभागामार्फत निवड सूची कार्य 2024-25 उपजिल्हाधिकारी (निवड श्रेणी) संवर्गातून पात्र अधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी पदी संवर्गातील नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर पदोन्नती व पदस्थापना देण्याचे आदेश शासनाचे उपसचिव महेश वरुडकर यांनी मंगळवारी जाहीर केले आहेत. यामध्ये अमृत नाटेकर व भूसंपादनाचे प्रमोद गायकवाड यांची अकोल्याच्या अप्पर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे त्याचबरोबर धाराशिवच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी ज्योती पाटील यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे, त्यामुळेच्या सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील रहिवासी आहेत तलाठी पदापासून ते अप्पर जिल्हाधिकारी पदापर्यंत जाण्याचा त्यांचा प्रवास थक्क करणार आहे, सोलापूर प्रांताधिकारी म्हणून त्यांनी यापूर्वी काम पाहिले आहे, तिथून सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्यांच्या प्रांत अधिकारी म्हणून काम होते, सोलापूर सातारा रायगड सांगली अशा जिल्ह्यातही त्यांनी उत्कृंष्ट सेवा दिली, त्यांच्या पदोन्नतीने सोलापूरकरांना चांगलाच आनंद झाला आहे, विशेष म्हणजे धाराशिवच्या आरडीसी शोभा जाधव याही सोलापूरच्या कन्या आहेत.
