कर्तव्यदक्ष वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर…! संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी. खाकी वर्दीतील आपलेपणा जपणारा आणि सर्वसामान्य गोरगरिबांना आजपर्यंत पोलीस खात्यात न्याय देणारे देव माणूस म्हणून ओळखले जाणारे आणि वाई तालुक्यांत तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे खराडे मॅडम यांच्या बदलीनंतर वाई उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील, पोलीस महासंचालक पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सातारा जिल्हा पोलीस दलातून तसेच विविध जिल्ह्यातून पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. वाई विभागातील आणि सातारा जिल्हा पोलीस दलातील वाई विभागाचे कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय बाळासाहेब भालचिम यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाल्याबद्दल समस्त पुरीगोसावी परिवार आणि रोखठोक महाराष्ट्र ग्रुप मधील सर्व मान्यवरांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा आहेत.
