एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पोलीस रेकॉर्डवरिल गुन्हेगार चोर राजाला त्याच्या साथीदारासह केली अटक व घरफोडीचे ८ गुन्हे उघडकीस. हडपसर पोलिसांची दमदार कामगिरी

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

पोलीस रेकॉर्डवरिल गुन्हेगार चोर राजाला त्याच्या साथीदारासह केली अटक व घरफोडीचे ८ गुन्हे उघडकीस.
हडपसर पोलिसांची दमदार कामगिरी.

पुणे जिल्हा उपसंपादक: गणेश राऊत

हडपसर (पुणे):आज दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५. पुणे शहर श्री. राजकुमार शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय मोगले, यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे तपासपथक प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, व सत्यवान गेंड, व पोलीस अंमलदार यांची बैठक घेवून घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्या बाबत आराखडा तयार केला. त्याप्रमाणे घरफोडी चे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता घटनास्थळास वेळोवेळी भेट देवून त्यामधील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करण्याबाबत नियोजन केले होते.
दि.१७ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या घरफोडीच्या गुन्हयामध्ये एक इसम स्पेलेंडर गाडीवरून येवून घरफोडी करून जात असल्या बाबत फुटेजच्या आधारे निष्पन्न झाले. सीसीटीव्ही फुटेज व मिळालेल्या बातमीच्या आधारे रेकॉर्डवरिल घरफोडी गुन्हे करणारा आरोपी नाव १) राजेश राम पपुल वय ४० वर्ष रा. सच्चाई माता मंदिर दुगड चाळ, कात्रज पुणे २) प्रदीप ऊर्फ गणेश बाळासाहेब गाडे वय ३५ वर्ष रा. गगनगिरी हाईटस नांदेड सिटी पुणे यांना दि.१०एप्रिल २०२५ रोजी हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ८४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५.३३१.३ (५) या गुन्ह्यात अटक करण्यात आली. आरोपींकडे केलेल्या तपासात त्यांनी दाखल गुन्हा केल्याची कबुली देवून इतरही गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीकडे केलेल्या तपासात त्याच्या कडून हडपसर पोलीस स्टेशनकडील एकुण ८ गुन्हे उघडकीस आलेले असुन सदर गुन्हयातील चोरून नेलेले सोन्याचे दागिने हे सोनार कुणाल वाफगावकर रा. सिंहगडरोड पुणे यास मध्यस्थी मार्फत वेळोवेळी विकल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे सोनार कुणाल वाफगावकर रा. गंजपेठ पुणे यास तपासकामी हजर राहण्या बाबत नोटीस अदा करण्यात आली होती. परंतु कुणाल रुपेश वाफगांवकर वयः वय २३ वर्षे रा मंदार अर्पाटमेंन्ट फ्लॅट नं १६, दांगट पाटील नगर सिंहगड रोड पुणे हा तपासकामी हजर न झाल्याने त्यास दाखल गुन्ह्यात दि. २४एप्रिल २०२४ रोजी अटक करण्यात आली आहे.आरोपी राजेश राम पपुल वय ४० वर्ष रा. सच्चाई माता मंदिर दुगड चाळ, कात्रज पुणे हा पुणे पोलीसांच्या अभिलेखावरिल आरोपी असून त्याचेविरूध्द यापुर्वी पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात ४० हून अधिक मालमत्ते संबधाने गुन्हे दाखल आहेत. तो चोर राजा नावाने ओळखला जातो. तसेच आरोपी प्रदीप ऊर्फ गणेश बाळासाहेब गाडे वय ३५ वर्ष रा. गगनगिरी हाईटस नांदेड सिटी पुणे याचे विरूध्द ही ५ गुन्हे दाखल आहेत.
आरोपी याने पकडले जावू नये याकरीता गुन्ह्याची सुरवात व शेवट या दरम्यान वेळोवेळी दुचाकी बदलणे, रिक्षाचा वापर, कपडे बदलणे, मास्क लावणे इत्यादी खबरदारी घेत असत. तरी देखील हडपसर तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी ३ महिन्यात रांजगणगाव ते कात्रज या भागात सुमारे ७०० हून अधिक किलो मिटर परिसरात फिरून सीसीटीव्ही फुटेज पाहणी व त्या मार्गाचे केलेले बातमीच्या आधारे आरोपी निष्पन्न करून अटक केली आहे.
सदरची कामगिरी ही मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परि ५ पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, यांचे मागदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्रीमती अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन श्री. संजय मोगले, पोनि (गुन्हे), श्री. निलेश जगदाळे, यांचे सुचनांप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अनिल बिनवडे, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, सचिन जाधव, दिपक कांबळे, अमित साखरे, निलेश किरवे, बापू लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महाविर लोंढे, सागर ननवरे, दत्तात्रय खेडेकर यांचे पथकाने कामगिरी केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link