एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

बनावट नोटा छापणा-या टोळीचा शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडील सायबर पथकाकडुन पर्दाफाश. मोठ्या प्रमाणात बनावट नोटा व नोटा छापण्याचे साहित्य जप्त

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

बनावट नोटा छापणा-या टोळीचा शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडील सायबर पथकाकडुन पर्दाफाश. मोठ्या प्रमाणात बनावट नोटा व नोटा छापण्याचे साहित्य जप्त.

पुणे जिल्हा सहसंपादक: गोपाळ भालेराव

पुणे: शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दि१७एप्रिल २०२५ रोजी कोटक महिंद्रा बँकेचे मॅनेजर यांनी फिर्याद दिली की, त्याचे बँकेचे सीडीएम मशिन मध्ये २०० रूपये दराच्या ५५ बनावट नोटा जमा करण्यात आल्या आहेत. अशा फिर्यादी वरून शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५९/२०२५ भा.न्या.स कलम १७८, १७९, १८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस तपास पथक गठीत करून त्वरीत तांत्रिक विश्लेषण कले. आरोंपींताचा शोध घेवून आरोपी नाव १. मनिषा स्वप्निल ठाणेकर वय ४२ वर्षे रा. नागपुर चाळ, येरवडा, पुणे २. भारती तानाजी गवंड वय ४४ वर्षे रा. मोर्या गोसावी, राजपाल सी १०, केशवनगर, चिंचवड, ३. सचिन रामचंद्र यमगर, वय ३५, रा. गहुंजे, पुणे, यांना दिं१८एप्रिल २०२५ रोजी अटक करण्यात आले. अटक आरोपींताकडे कसून तपास केला असता नमुद आरोंपीतांनी सदरच्या नोटा कोल्हे नावाच्या व्यक्तीकडून प्राप्त केले असल्याचे समजले. कोल्हे नावाच्या इसमाबाबत अधिक माहिती प्राप्त केली असता त्याचे नाव ४. नरेश मिमप्पा शेटटी वय ४० वर्षे रा. लोहगाव, पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले असता सदर इसमाचे घरी छापा टाकला असता त्याच्या घरामध्ये २००/- रुपये दराचे बनावट नोटांचे २० बंडल ज्याचे बजारातील मुल्य ४,००,०००/- रुपये, ख-या नोटा २,०४,०००/- रुपये, नोटा छापण्याचे प्रिटंर, ५००/- रुपये दराच्या ए४ साईजचे १,११६ कागदांवर प्रत्येक कागदावर ४ नोटा या प्रमाणे एकुण २.२३२ प्रिंट केलेल्या नोटा ज्याचे बाजारमुल्य २२,३२,०००/- रुपये, नोटा प्रिंट करण्यास वापरण्यात येणारी शाई, नोटा छापण्याचे कोरे कागद व इतर साहित्य तसेच नमुद आरोपीचे कार मधून एमएच १२ डब्ल्यु के ३७६१ मधुन बनावट २००/- दाराच्या ६४८ नोटा व तसेच ५०० रुपये ३ बनावट नोटा ज्यांची बाजारातील किंमत १,३१,१००/- रुपये जप्त केले,
या गुन्हयातील इतर आरोपी नाव भारती गवंड यांच्या कडून २००/- रुपये दराच्या ६०,०००/-रुपये किंमतीच्या बनावट नोटा आरोपी मनिषा ठाणेकर (पाटील) यांचे कडून बनावट २००/- दराच्या २०,०००/-रुपयांच्या नोटा, सचिन यमगर यांच्या कडुन २००/- दराच्या २०,०००/- रुपयांच्या नोटा, असे साहित्य जप्त केले. आरोपी नाव नरेश शेटटी यांचा अधिक तपास केला असता सदर गुन्हयामध्ये त्यास आरोपी ५. प्रभू लक्ष्मण गुगलजेडडी वय ३४ वर्षे रा. विश्रांतवाडी पुणे याने मदत केली असल्याचे तांत्रिक विश्लेषनावरून त्यास देखिल अटक करण्यात आली. सदर आरोपी कडून २००/- दराच्या ३,०००/-

रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत सदर गुन्हयातील सर्व आरोपीतांचा दि २९/०४/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी रिंमाड घेण्यात आले असून आज पर्यंत गुन्हयातील सर्व आरोर्पीताकडून एकुण २८,६६,१००/- रुपयांचे २०० व ५०० रुपयांचे बनावट नोटा व २,०४,०००/-रुपयांच्या ख-या नोटा व इतर साहित्य गुन्हयात वापरलेल्या कारसह जप्त करण्यात आले आहे. गुन्हयातील नोटा छापण्यास वापरण्यात आलेले लॅपटॉपमालक व तसेच इतर आरोपीची नावे निष्पन्न झाले असून त्यांचा कसोशीने शोध सूरू आहे.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परि-१, श्री. संदिपसिंह गिल्ल, मा. सहा पोलीस आयुक्त, श्री. साईनाथ ठोंबरे, विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, सहा पोलीस निरीक्षक के बी डाबेराव, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस अंमलदार नलिनी क्षिरसागर, आदेश चलवादी, तेजस चोपडे, गणेश जाधवर, श्रीकृष्ण सांगवे, प्रविण दडस, रुचिका जमदाडे, स्वालेहा शेख यांनी केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link