अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
वाहन तोडफोड करणा-या गुन्हेगारांना धारदार शस्त्र व वाहनांसह केली अटक.
गुन्हे शाखेची दमदार कामगिरी
कार्यकारी संपादक: किरण सोनवणे
पुणे:दि.२८एप्रिल २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ३. अंतर्गत वारजे माळवाडी पोलीस स्टेशन कडील वारजे चौक बीट मार्शल पोलीस अंमलदार शुभम महाजन व अनिरुध्द ओव्हाळ हे रात्री वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वरिष्ठांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे गुन्हे प्रतिबंधक गस्त घालीत असताना दि.२७/०४/२०२५ रोजी ०४ साथीदारांसह अतुल नगर येथील फर्निचर चे दुकान व डुक्कर खिंड येथे उभी असलेली ०४ चाकी वाहने दगड टाकुन धारदार शस्त्राने वाहनांची तोडफोड केलेला आरोपी हा वारजे येथील म्हाडा वस्ती, सर्व्हिस रोडने डुक्कर खिंड ओयासिस हॉटेलकडे जाताना ऑटो स्पा वॉशिंग सेंटर येथे पोलीस गाडी पाहुन वॉशिंग सेंटरच्या पाठीमागील बाजुस पळत जाताना दिसला त्यावेळी त्यास थांबण्यास सांगितले असता, तो तसाच पुढे जात होता तेव्हा त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव, पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव सुरज राणा गिरी वय २१ वर्षे रा. अतुल नगर सोसायटीच्या पाठीमागे वारजे पुणे असे असल्याचे सांगितले. तसेच त्याच्याकडे अवैध धारदार शस्त्र व वाहन मिळुन आल्याने ते ताब्यात घेवुन सी. आर मोबाईल वरील चालक पोलीस अंमलदार यांनी चेतन गद्रे, सेवक जाधव व विजय जाधव यांची मदत घेवुन त्यास वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे आणुन त्याच्यावर वारजे माळवाडी पो. स्टे गु.र.नं १७९/२०२५ कलम ४(२५),३७(१) ३७ (३) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे १. श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रंगराव पवार, तसेच पोलीस अंमलदार शुभम महाजन, अनिरुध्द ओव्हाळ, चालक पोलीस अंमलदार चेतन गद्रे, सेवक जाधव व विजय जाधव यांनी केली
