अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
खुनाच्या गुन्हयातील मुख्य आरोपीच्या सातारा येथे जाऊन
आवळल्या मुसक्या
मुख्य संपादक: संतोष लांडे
वानवडी(पुणे):दि.२५एप्रिल २०२५ रोजी स.नं.१२७८/७१, शांतीनगर, वानवडी पुणे येथील सरकारमान्य ताडीचे दुकानात फिर्यादीचे वडील मलंग मेहबुब कुरेशी वय ६० वर्षे रा. लेननंबर १२, बाबाजान मस्जिद जवळ, शिवनेरीनगर, कोंढवा पुणे यास तेथील इसम नाव आकाश धांडे याच्या सोबत वाद झाल्याने त्याने व त्याचे मित्र आरोपी नाव अदिल शेख, पांडा यांनी आपसात संगनमत करुन ताडी पिण्याचे कारणावरुन आकाश दांडे याचेसोबत झालेल्या वादावरुन त्यांना हाताने मारहाण करुन, जीवे ठार मारण्याचे उद्देशाने रागात त्यांना ताडी दुकानाचे दरवाज्याचे लोखंडी चौकटीवर जोरात ढकलून देवून डोक्यास गंभीर जखमी करुन जीवे ठार मारले होते म्हणून फिर्यादी सोहेल मलंग कुरेशी यांनी वानवडी पोलीसांकडे तक्रार दिल्याने वानवडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १७८/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), ११५ (२), ३ (५) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल आहे.सदर प्रकार घडताच पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीचा शोधकार्य सुरू केले. यातील दोन आरोपी १) अदिल हनीफ शेख व २) पांडा ऊर्फ पांडुरंग नामदेव पवार यांना पोलीसांनी अटक केली. नमुद आरोपीकडे व साक्षीदारांकडे तपास केला असता मुख्य आरोपी आकाश दांडे असलेची माहिती मिळाली, त्यामुळे लागलीच पोलीसांनी नमुद आरोपीचे शोध कार्य चालु करुन बातमीदारांमार्फतीने माहिती घेता तपास पथकाला माहिती मिळाली की, सदर आकाश दांडे हा सातारा येथे असल्याची गोपनिय बातमी मिळाली. त्याप्रमाणे मा. वरिष्ठांचे सुचनेप्रमाणे वानवडी तपास पथकाची टिम तात्काळ सातारा येथील नामदेव वडार वाडी येथे जाऊन शोध घेतला असता तो काही वेळापुर्वीच तेथुन निघुन गेल्याचे समजले. तेव्हा लागलीच नमुद आरोपीकडील मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करता त्यास आनेवाडी, ता. वाई, जि. सातारा येथुन वानवडी पोलीस ठाणेचे तपास पथकाने ताब्यात घेतले. त्याचे नाव आकाश हरिश्चंद्र दांडे, वय-२० वर्षे, रा. लक्ष्मीपार्क, कोळसा गल्ली, मोहम्मंदवाडी, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे केलेल्या तपासात नमुद आरोपी हा सरकारमान्य ताडी दुकानात ताडी पिऊन बाहेर आल्यावर तेथे मयत इसम मलंग कुरेशी याचे सोबत किरकोळ कारणांवरुन झालेल्या वादात त्याचेबरोबर नमुद आरोपीने त्याचे साथीदारांसह मारहाण केली व त्यास लोखंडी दरवाज्यावर जोरात ढकलुन देऊन त्यास जिवे ठार मारले. तेव्हापासुन तो इकडे-तिकडे पळत असल्याचे सांगितले. वगैरे सांगितल्याने नमुद मुख्य आरोपीस पोलीसांनी अटक करुन मा. न्यायालयात मुदतीत हजर केले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस उप आयुक्त परि.५ पुणे शहर, श्री. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, श्री. धन्यकुमार गोडसे, वानवडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सत्यजीत आदमाने, पोलीस निरिक्षक गुन्हे श्री. गोविंद जाधव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, बनाजी टोणे, व पोलीस अमंलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाने, अतुल गायकवाड, यतीन भोसले, गोपाळ मदने, बालाजी वाघमारे, विष्णु सुतार, अभिजीत चव्हाण व सोमनाथ कांबळे यांनी केली आहे.
