अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रदर्शन सहायक राजू निकोडे यांना संचालक (माहिती) कार्यालयातर्फे निरोप
प्रतिनीधी सतीश कडू नागपूर
नागपूर, दि २९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती, संचालक कार्यालयातील प्रदर्शन सहायक राजू निकोडे हे नियतवयोमानानूसार सेवानिवृत्त झाले असून आज त्यांना कार्यालयाच्यावतीने निरोप देण्यात आला.
संचालक कार्यालयात आयोजित निरोप समारंभात जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्या हस्ते श्री. निकोडे यांना भेट वस्तू, शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी माहिती केंद्राचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी रितेश भुयार, सहायक संचालक पल्लवी धारव, माहिती अधिकारी अतुल पांडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
श्री. निकोडे हे राज्य शासनाच्या ग्रामीण ध्वनीक्षेपण विभाग, गडचिरोली येथे 12 फेब्रुवारी 1986 रोजी रूजू झाले. यानंतर सन 2001 मध्ये त्यांची माहिती व जनसंपर्क या विभागाच्या गडचिरोली जिल्हा माहिती कार्यालयात नियुक्ती झाली. श्री निकोडे हे ऑक्टोंबर 2006 पासून संचालक (माहिती), नागपूर या कार्यालयात कार्यरत होते. 39 वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर नियतवयोमानानुसार श्री. निकोडे 30 एप्रिल 2025 रोजी सेवानिवृत्त झाले. या संपूर्ण सेवा काळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे व यशस्वीपणे सांभाळल्या.
