मेंढपाळाचा मुलगा झाला आयपीएस अधिकारी, मित्राचा फोन आला आणि आनंदच आनंद झाला
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच आयपीएस अधिकारी झाला
संभाजी पुरीगोसावी (कोल्हापूर जिल्हा) प्रतिनिधी.
कोल्हापूर जिल्ह्यांतील कागल तालुक्यातील यमगे गावातील बिरुदेव सिद्धाप्पा डोणे हा मेंढपाळाचा मुलगा आयपीएस अधिकारी झाला आहे, बिरदेवचे वडील सिद्धाप्पा ढोणे यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची मेंढपाळ व्यवसाय करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, खांद्यावर घोंगडे डोक्यावर टोपी पाणी पिण्यासाठी लोकरीचा काचोळा काखेत मारून पायात जाडजूड पायतान मेंढ्या करण्यासाठी रानोमाळ भटकंती वर आभाळ… खाली धरती हेच आपले घर माणून जीवन काढणाऱ्या एका मेंढ्यापाळाच्या मुलाने अथक प्रयत्नातून आयपीएस अधिकारी होण्यापर्यंत चांगलीच मजल मारली आहे, तो ही परीक्षा पास झालेला निकाल ऐकण्यासाठी सुद्धा गावी नव्हता चक्क मेंढपाल वस्तीत मेंढ्यांच्या केसांची कात्रण करीत असताना मित्राचा फोन आला अरे तू यूपीएससीची परीक्षा पास झालास अभिनंदन. तर जवळच असलेल्या आई-वडिलांना आपला मुलगा साहेब झाला एवढेच समजले उमगले, आणि अवघ्या मेंढपाळ वाडा आनंदाच्या भरात सुंबरांन मोडलं गं सुंबरान मोडलं हे गीत गाऊ लागले की हकीकत आहे कागल तालुक्यांतील बिरुदेव सिद्धाप्पा डोणे या युवकांची,2024 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत कागल तालुक्यांतील यमगे येथील मेंढ्यापाळाचा मुलगा अवघ्या 27 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नांत 551 रॅकने उत्तीर्ण झाला आहे, त्यामुळे बिरदेव हा कागल तालुक्यांतील पहिला आयपीएस अधिकारी झाला आहे, बिरदेवाचा भाऊ वासुदेव डोणे हा चार वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात भरती झाला आहे, त्यामुळे बिरदेवाच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळू शकली वडील सिद्धाप्पा आई बाळाबाई विवाहित बहीण भाऊ असे त्यांचे कुटुंब आहे,
