गडचिरोलीत मा.खा. डॉ. अशोकजी नेते ह्यांनी ‘मन की बात’ चा कार्यक्रम पाहतांना
प्रतिनिधी सतिष कडू
गडचिरोली, दि. २७ एप्रिल २०२५
भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालयात आज पंतप्रधान मान. नरेंद्रजी मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा १२१ वा भाग उत्साहात पाहण्यात आला.
शहरातील शाहूनगर प्रभागातील बुथ क्रमांक १०१ येथे आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विचारांचा थेट प्रसार करण्यात आला. या प्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, भाजपा विधी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. विजय चाटे, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात पंतप्रधानांनी नुकत्याच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत, या घटनेने संपूर्ण देशवासीयांच्या मनात व्यथा निर्माण केल्याचे व्यक्त केले. दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.यासोबतच विविध राष्ट्रीय विषयांवर मार्गदर्शन करत पंतप्रधानांनी देशवासीयांमध्ये नवचैतन्य व प्रेरणा जागवली. उपस्थित कार्यकर्त्यांनीही मनोभावे ‘मन की बात’ श्रवण करून राष्ट्रहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
