ब्रिगेडियर रसेल डिसूजा कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व : डॉ. उद्धव शिंदे
‘स्नेहबंध’च्या वतीने सन्मान
प्रतिनिधी- सारंग महाजन.
अहिल्यानगर – कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय व दिलखुलास व्यक्तिमत्त्व असलेल्या छावणी परिषदेचे अध्यक्ष तथा एमआयसी अँड एसचे ते कमाडंट ब्रिगेडियर रसेल डिसूजा यांनी आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवला. उत्कृष्ट कार्यपद्धतीमुळे त्यांनी छावणी परिषदेंतर्गत येणाऱ्या नागरिकांची मने जिंकून घेतली. कर्तव्यदक्ष म्हणून त्यांची ख्याती आहे. त्याची चुणूक त्यांनी दाखवून दिली, असे प्रतिपादन स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले. ब्रिगेडियर डिसूजा यांची कोलकत्ता येथे बदली झाली. यानिमित्त त्यांचा स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने शाल व रोप देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी डॉ. शिंदे बोलत होते. यावेळी छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे आदी उपस्थित होते.
डॉ. शिंदे म्हणाले, ब्रिगेडियर डिसूजा यांच्या कामाच्या पद्धतीने संपूर्ण सैन्य दल त्यांच्यावर खुश आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शन खाली सायक्लोथॉन, मॅरेथॉन स्पर्धाही आर्मी परिसरात सुरू झाल्या. छावणी परिषद शाळांविषयी त्यांना विशेष ओढ व आपुलकी आहे. सर्वांत मिळून मिसळून काम करण्याची पद्धत हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. एक आदर्श अधिकारी व व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी जनमाणसांत ठसा उमटला आहे.
