अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
रयत कामगार संघटना व आंबेगाव ग्रामस्थ यांनी श्रद्धांजली वाहून पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त केला
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पोलिसांच्या वेशात आलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून एक एकाला ठार केले.या भ्याड हल्ल्याचा आंबेगाव बुद्रुक पुणे रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व आंबेगाव बुद्रुक ग्रामस्थांनी भैरवनाथ मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर जोरदार घोषणाबाजी करून या हल्ल्याचा जाहीर शब्दामध्ये निषेध केला. पाकिस्तान मुर्दाबाद या घोषणा देत संतप्त झालेल्या ग्रामस्थ व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या हिरव्या झेंड्याचे दहन करत संताप व्यक्त केला.
यावेळी आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने (सर) यांना निवेदन देण्यात आले . यावेळी रयत कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते दादासाहेब गायकवाड, भाजपाचे संदीप भाऊ बेलदरे पाटील,ऋषिकेश गायकवाड, इरफान बागवान, निखिल पराड, शरद कोंढरे, नागरगोजे, निखिल झांबरे, रमेश वनशिव, कुमार दुबे,adv पूजा गायकवाड, पूजा वनशिव, गोरक्ष कोंढरे, अमित काळे, विकी गोसावी, आकाश गोसावी, आंबेगाव बुद्रुक मधील रहिवासी व रयत कामगार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
