साई सेवक मंडळ वर्धापन २९ व दिन सोहळामोठ्या प्रमाणात साजरा केला
प्रतिनिधी गणेश दळवी
दिनांक:- २४/४/२०२५ रोजी मुंबई परळ येथे साई बाबांचा २९ व वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला,साईभक्तानी साईंच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी केली होती,
तसेच साई ची भजने गाणी गायली गेली आणि महाप्रसादाचा चा भक्तांनी लाभ घेतला भक्तगणांनी भजने आणि सुरेल गाण्यांचा आनंद घेत महाप्रसादाचा लाभ घेतला.
तसेच शिवसेना मा. आमदार अजय चौधरी साहेब (उद्धव ठाकरे गट) मा.नगरसेवक अनिल कोकीळ. यांनी मंडळा ला भेट दिली.
कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, नेते, महिला आघाडी तसेच पोलिसांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. संपूर्ण वातावरण भक्तीमय आणि जल्लोषात न्हाल्याचे दृश्य होते. साजरा केलेला हा वर्धापन दिन सोहळा साई भक्तांसाठी एक सुंदर अविस्मरणीय ठरला.
