श्री. धनराज सोपान उपाडे यांना ‘आंतरराष्ट्रीय प्राईड पुरस्कार’
प्रतिनिधी -सारंग महाजन.
सामाजिक संघर्ष व समर्पित कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल
आपल्या अथक परिश्रम, समाजसेवेतील योगदान व संघर्षमय कार्यासाठी श्री. धनराज सोपान उपाडे यांना ‘इंटरनॅशनल प्राईड अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळवून त्यांनी केवळ आपल्या कार्याचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची प्रतिष्ठा जागतिक पातळीवर उंचावली आहे.
श्री.धनराज सोपान उपाडे यांनी समाजातील दुर्बल, उपेक्षित घटकांसाठी सातत्याने काम करत समाज परिवर्तनाचे दीप पेटवले. त्यांच्या कार्यामुळे असंख्य लोकांचे जीवनमान उंचावले आहे. विविध अडचणींना सामोरे जात त्यांनी केलेले कार्य हे प्रेरणादायक असून, त्यांचा हा गौरव इतरांसाठीही मार्गदर्शक ठरेल.
“हा पुरस्कार माझ्या कार्याची पावती असून, समाजासाठी अजून अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे,” असे श्री.धनराज सोपान उपाडे यांनी सांगितले.
