वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील अन्याय कधीही खपवून घेणार नाही:डॉ तपसे CAGMO राज्याध्यक्ष
प्रतिनिधी -सारंग महाजन.
ग्रामीण रुग्णालय, किल्लारी (ता . औसा , जि . लातूर) येथील गट-अ वैद्यकीय अधिकारी यांच्यावर दि. 18 एप्रिल 2025 रोजी किल्लारी पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या मारहाणीचा कास्ट्राईब राजपत्रीत वैद्यकीय अधिकारी संघ महाराष्ट्र राज्य तर्फे आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो .
ही घटना केवळ एका डॉक्टरवर झालेला हल्ला नसून, ती संपूर्ण वैद्यकीय व शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम करणारी आहे. त्या मुळे याची तातडी ने चौकशी करून कठोर पावले उचलण्याची गरज आहे.आज एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर वेळ आली आहे भविष्यात कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अन्याय वा हल्ले होऊ नयेत याकरता शासनाने उपाययोजना कराव्यात.सदरील डॉक्टर यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन उभारले जाईल. जनतेचे जीव वाचवणाऱ्या जीवांचे रक्षण व्हावे हीच मागणी कॅगमो संघटनेची आहे. लवकरच या घटनेचा पाठपुरावा मंत्रालय मुंबई येथे करण्यात येईल असे कॅगमो राज्याध्यक्ष डॉ दत्ता तपसे, सचिव डॉ निलेश भालेराव, कोषाध्यक्ष डॉ प्रज्ञा तरकसे, कार्याध्यक्ष डॉ कल्याण शिंदे यांनी कळविले आहे.तसेच सदर वैद्यकीय अधिकारी सोबत आहोत.








