श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट जय गणेश महा आरोग्य दिव्यांग शिबिरास मधु तारा हर्ष फाऊंडेशनची भेट
पुणे जिल्हा उप संपादक गणेश राऊत
*दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट पुणे जय गणेश महा आरोग्य तसेच दिव्यांग शिबिर नू म वी महाविद्यालय बाजीराव रोड पुणे येथे अनेक संस्थांच्या हॉस्पिटलच्या सहकार्याने महा आरोग्य शिबीर तसेच दिव्यांग शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले.*
*या महाआरोग्य शिबिरास मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे.रक्तदाते हर्ष फाऊंडेशनचे प्रमुख श्री आप्पासाहेब घोरपडे यांनी भेट दिली.*
*आरोग्य आणि दिव्यांग यांच्यावर घेण्यात आलेल्या शिबिरास राज्यभरातील हजारो लाभार्थ्यांना या शिबिराचा लाभ झाला.*
*या वेळी साधू वासवानी मिशन इनलेक्स बुधरानी यांच्या सहकार्याने दिव्यांगाना मोफत कृत्रिम अवयव प्रदान रोजगार.आरोग्य.दिव्यांगच्यावर उत्कृष्ट कार्य करणारे श्री रोशनजी मराठे सर यांचे लक्ष्य फाऊंडेशन.लहान मुलांवर मोफत अल्पदरात सर्व शस्त्र क्रिया करणारे पुणे येथील जहांगीर हॉस्पिटलचे डॉ श्री अशोकजी घोणे सर आरोग्यावर अल्पदरात आयुर्वेदिक उपचार देणारे प्रिस्टीन संस्थेचे पद्मश्री डॉ श्री प्रवीण बडे सर.*
*अशा या लोकोपयोगी जीवाला जीव देणाऱ्या कार्यात अनेक संस्थांनी सहभाग घेतला.पुणे मनपा यांचे शहरी गरीब योजना.कमला नेहरू हॉस्पिटल यांच्या वतीने माफक दरात सर्व टेस्ट असे अनेक आरोग्यावर कार्य करणारे हॉस्पिटल व संस्थांनी या उपक्रमात आपण ही समाजाचे देणे लागतो या भावनेने गोरगरिब रुग्ण दिव्यांग यांच्या साठी आपला सहभाग नोंदवला.*
*या वेळी आलेल्या सर्व लाभार्थ्यांसाठी चहा पाणी भोजनाची व्यवस्था श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट अंतर्गत सुवर्णयुग तरुण मंडळ यांनी केली.*
*अशा समाजपयोगी घेण्यात आलेल्या उपक्रमासाठी मधु तारा प्रमुखांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळ यांचे पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.*
