प्रतिनिधी- सारंग महाजन. रसिक हो‚तंत्र- तंत्रज्ञानाच्या द्रूष्टीने वेगवान पण विलक्षण क्लिष्ट ‚ निर्विकार व रूक्ष असा हा काळ.
५०‚ ६०‚ ७०‚ अगदी ८० पर्यंतच्या दशकात जीवन सुसह्य करणारी अवीट गोडीची अस्सल व सुश्राव्य रोमँटिक गाणी असायची. तीव्र ताणलेल्या मनाला शीतल दिलासा‚ उभारी‚ ऊर्जा देणारी कलावंत मंडळी तेव्हा आपल्याबरोबर होती. आता – काही सन्माननीय अपवाद वगळता – वो बात बिलकुल नहीं रहीं, लेकिन वो बात कहाँ ?
अस्सल प्रेमगीतं‚ मनाला तरलपणाचा – पवित्र उबदारपणाचा स्पर्श करणारी अस्सल रोमँटिक गाणी तर
जणू कालबाह्यच झाली हो.
आजच्या काळाची‚ आजच्या मनांची ही भावनिक गरज‚ घुसमट लक्षात घेऊन प्रवीण लाड आणि टीमने मन ‘गुंतले सजणा’ मराठी अल्बम साँगची निर्मिती केली आहे.
‘’अरविंद एंटरटेंमेंट प्रेसेंटस इन असोसिएशन विथ अक्षय ड्रायक्लीनर्स आणि सपोर्टिंग पार्टनर बंधन प्रॉडक्शन व भाग्यदीप म्युझिक’’ हे अस्सल माराठमोळे रोमॅंटिक ओफिशियल अल्बम सॉन्ग घेऊन आपल्या भेतील येत आहेत.
गाण्याचे टिजर आज अरविंद एंटरटेंमेंट या यूट्यूब चॅनल वर प्रेक्षकांना बघायाला मिळाले असून पूर्ण सॉन्ग हे येत्या 22 एप्रिल ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे असे अरविंद एंटरटेंमेंट चे संस्थापक प्रविण लाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या गाण्याचे गायन महाराष्ट्राची सुप्रसिद्ध व लाडकी गायिका ‘सोनाली सोनवणे’ यांनी गायले असून, गाण्याचे कथा, लेखन व चालबद्ध ‘प्रविण लाड’ यांनी केले आहे. चित्रीकरण, संकलन व डिआई ‘श्री. योगेश ठाकूर (बंधन प्रॉडक्शन)’ यांनी केले असून सहचित्रीकरण ‘ऋषिकेश धाकने’ यांनी सांभाळले, गाण्याचे दिग्दर्शन दिग्दर्शक ‘श्री. प्रदीप भोई व प्रविण लाड’ यांनी केले आहे तर गाण्याचे प्रोड्युसर श्री. आशिष लाड हे आहेत.
या गाण्याचे चित्रीकरण अलिबाग येथील रम्य वातावरणात झाले. या गण्यामधून बालकलाकार ‘कु.मित्रा सोनवणे आणि ची.शंतनू वर्मा’ यांनी मराठी सिनेजगतात नुकतेच पदार्पण केले असून मित्रा व शंतनू यांचा अगदी नॅच्युरल अभिनय तुम्हाला या गाण्यातून बघायला मिळणार आहे. दोघांनी अतिशय छान काम केल्याने दोघांचे कौतुक होत आहे. तसेच मुख्य कलाकाराच्या भूमिकेत के. एल. आरती (आरती कतोरे) व प्रविण लाड यांनी काम केले आहे. चित्रीकरणा वेळी मेकअप ही सुद्धा महत्वाची भूमिका असते ती ‘प्रियंका लिंगाडे’ यांनी पार पाडली असून अतिशय छान असे हे रोमॅंटिक सॉन्ग आपल्या भेटीला लगेच येत आहे त्यामुळे पूर्ण टीम मध्ये आनंदाचे वातावरण दिसून येते.
‘मन गुंतले साजणा’ हे गीत प्रत्येक ऑडिओ प्लॉटफॉर्म ला 22 एप्रिल पासून उपलब्ध असून गाण्याचे वर्ल्ड वाइड प्रसार होणार आहे. प्रेक्षकांना हे सॉन्ग नक्कीच आवडेल असा प्रविण लाड यांनी विश्वास दिला.
तसेच आपल्या मलकापूर येथे मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षी ही भव्य असा ‘टॅलेंट शो आणि फॅशन शो’ येत्या 22 मे ला होणार असल्याचेही बोलताना त्यांनी सांगितले. ज्यामध्यमातून असंख्य अश्या कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ प्रविण लाड हे उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येणाऱ्या 21 मे ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अधिक माहिती www.arvindentertainment.com या संकेतस्थळावर मिळेल.
