प्रतिनिधी: गोपाळ भालेराव पुणे : दि.१८एप्रिल २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ३. कडील पथक हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधक गस्त घालीत असताना स.पो. फो. पंढरीनाथ शिंदे व पोलीस अंमलदार अमित बोडरे यांना त्यांच्या बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमी नुसार सन २००८ मध्ये वारजे माळवाडी पो.स्टे. येथील गु.र.नं.५९/२००८ भा.द.वि.क. ३०२ दाखल असलेला व कुरार पोलीस स्टेशन मुंबई शहर कडील जबरी चोरीच्या गुन्हयातील पाहिजे आरोपी नाव समीर भागवत. हा गोयलगंगा सोसायटी जवळ येणार असल्याची अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रंगराव पवार गुन्हे शाखा, युनिट ३ यांना कळविली असता, त्यानंतर वरिष्ठांनी कुरार पोलीस स्टेशन मुंबई शहर येथे संपर्क करून नमुद पाहिजे आरोपी कुरार पोलीस स्टेशन मुंबई शहर गु.र.नं. ४३/२०११ भा.द.वि.क. ३४२, ४५२, ३९२, ३९४, ३९७, ४११, ३४ यातील पाहिजे आरोपी असल्याची खात्री झाल्यावर त्यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह जावुन वरील गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेवुन ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर युनिट ३ कडील कर्मचाऱ्यांसह गोयलगंगा सोसायटी, सिंहगड रोड पुणे येथे शोध घेतला असता, नमुद आरोपी मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव, पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव समीर अशोक भागवत. वय ४३ वर्षे, रा. फ्लॅट नं ३. सी ४, नॅशनल पार्क माणिक बाग सिंहगड रोड पुणे. असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता, त्याने कुरार पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये २०११ साली रेकॉर्डवरील सराईत आरोपी निलेश चौगुले याचे सोबत गाडीने जावुन चोरीचा गुन्हा केला असल्याचे कबुल केले. त्यास पुढील कार्यवाही करीता कुरार पोलीस स्टेशन मुंबई शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१, श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रंगराव पवार, श्रेणी पो.उप. निरीक्षक तुपसौंदर, स.पो. फौ पंढरीनाथ शिंदे, अमित बोडरे, कैलास लिम्हण, सुजित पवार, चेतन शिरोळकर, अक्षय गायकवाड, अर्चना वाघमारे, भाग्यश्री वाघमारे यांनी केली आहे.
