उपसंपादक : गणेश राऊत. पुणे : आज दिनांक 18 एप्रिल 2025 राजी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी त्यांचे अधिपत्याखालील प्रादेशिक अपर पोलीस आयुक्त, परिमंडळीय पोलीस उप आयुक्त, विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त व पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना त्यांचे अधिपत्याखालील पोलीस स्टेशनला दर शनिवारी हद्दीतील नागरीकांच्या समस्या / तक्रारी निवारण करणेसाठी “तक्रार निवारण दिन” आयोजित करणेबाबत आदेशित केले आहे.
त्याप्रमाणे येत्या शनिवारी दिनांक १९/०४/२०२५ रोजी सकाळी १०.३० ते १३.३० या कालावधीत खालील नमूद तक्त्यामध्ये दर्शविलेल्या पोलीस स्टेशनला स्वतः पोलीस उप आयुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त हे हजर राहून त्या त्या पोलीस स्टेशन हद्दीतील नागरीकांच्या तक्रारी ऐकूण त्यांचे निवारण करतील.
ज्या पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस आयुक्त किंवा पोलीस उप आयुक्त नसतील त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे तक्रार निवारण दिनाची प्रक्रीया पूर्ण करतील.
नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी पोलीस स्टेशन येथे आपले तक्रार अर्ज प्रलंबित असल्यास उपस्थित रहावे.व आपल्या तक्रारीचे निवारण करावे.
