प्रतिनिधी : आदित्य चव्हाण पुणे :दिनांक १५/०४/२०२५ रोजी दुपारी ०२.४५ ते ०२.५० वा. नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीत श्री ज्वेलर्स, समर्थ कॉम्पलेक्स, रायकर मळा, धायरी, पुणे या नावाच्या सराफा दुकानामध्ये ३ अज्ञात चोरट्याने नकली पिस्तुलाचा धाक दाखवुन दुकानातील २० लाख रुपये किंमतीचे २२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरी करुन घेवुन गेले होते. त्याबाबत नांदेड सिटी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे अनोळखी ०३ इसमांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता.
वरील नमुद गुन्ह्यातील अनोळखी आरोपीनी दिवसा सराफाचे दुकानात धाडसी जबरीचोरी केल्याने त्यांचा शोध घेवुन, सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्या करीता मा. पोलीस आयुक्त . पुणे शहर यांनी आदेश दिले असता त्याप्रमाणे मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर व मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे शहर यांनी श्री. गणेश इंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १, व श्री. राजेंद्र मुळीक, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे २, पुणे शहर यांना वरील नमुद गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन करुन त्यांचे अधिपत्त्याखाली असलेल्या युनिट व पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करुन आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या असता.
त्याप्रमाणे सदर गुन्हयाच्या तपासा करिता गुन्हे शाखेकडील एकुण १२ पथके नेमण्यात आली होती, गुन्हे शाखेने कशोसीने सलग तपास करुन ४८ तासात गुन्हयामधील आरोपीत नाव १) राजेश ऊर्फ राजू चांगदेव गालफाडे वय ४० वर्ष, २) श्याम शेषेराव शिंदे वय ३७ वर्ष दोघे राहणार लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी, पुणे यांना लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी परिसरातून अटक करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १ श्री. गणेश इंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखेकडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान पवार, सहा. पोलीस निरीक्षक सी.बी. बेरड, सहा पोलीस उप निरीक्षक दिनकर लोखंडे, सहा पोलीस उप निरीक्षक अशोक आटोळे, पो.हवा गणेश लोखंडे, पो. हवा सुरेश जाधव, पो.हवा शशिकांत नाळे, पो.हवा, माळी, पोलीस अंमलदार तनपुरे, अमोल सरतापे, विनायक येवले, संदीप येळे, विक्रांत सासवडकर, राहुल इंगळे यांनी दमदार कामगिरी करून वरील आरोपीस अटक करण्यात आली व त्यांना पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आले.
