एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुस्तके माणसांना समृद्ध करतात – प्राध्यापक एस आर पाटील

प्रतिनिधी शंकर जोग पुणे. कोरेगाव ता. वाळवा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ज्येष्ठ माता मालन शंकर गोंधळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरी करण्यात आली. त्यानंतर सामुदायिक भीमवंदना करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर बाल चमुच्या लेझीम पथकाने सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधी माहिती सांगितली. त्यानंतर नवभारत ज्ञानवर्धिनीचे संस्थापक समाजरत्न प्रा. एस. आर. पाटील यांनी या जयंतीनिमित्त बाल वयातच मुलांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास व्हावा म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाची अनेक ग्रंथ तसेच राज्यघटनेची प्रत मुलांच्या अभ्यासासाठी बुद्ध विहार येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचन मंडळामध्ये कायमस्वरूपी ठेवण्यासाठी भेट द्यायची संकल्पना विशद केली. हे ग्रंथ कोरेगावच्या लोकनियुक्त सरपंच प्रा. मानसी पाटील यांच्या हस्ते इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथांचे मुलांमध्ये वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलताना सरपंच प्रा. मानसी पाटील यांनी कोरेगावात ” गेली पाच वर्षापासून नवभारत ज्ञानवर्धिनी पुणे संस्था वाचन चळवळीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे मोठे कार्य करीत आहे. असे प्रतिपादन केले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त गाव व्यसनमुक्त करण्याची घोषणा विजय कांबळे यांनी केली. बी. के. पाटील सरांनी आपल्या मनोगतातून गावात चालू असलेले विविध सार्वजनिक कार्याची माहिती विशद केली.

समाजरत्न प्रा. एस. आर. पाटील यांनी ” वाचन चळवळीचे महत्त्व सांगताना पुस्तकेच माणसांना समृद्ध करतात. सूर्याच्या तेज्यापेक्षा, चंद्राच्या तेज्यापेक्षा, अग्नीच्या तेज्यापेक्षा, मानवी प्रज्ञा अधिक श्रेष्ठ असते आणि म्हणून ही प्रज्ञा विकसित करण्यासाठी तसेच महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न म्हणून आजच्या या दिवशी हे ग्रंथ सप्रेम भेट दिले जात आहेत. ही बाब गावाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. तसेच ज्ञानदानाच्या निरंतरपणे चालणाऱ्या कार्यात सर्वांच्या योगदानाचे अपेक्षा व्यक्त करतो. ” असे प्रतिपादन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष गोंधळी, विजय कांबळे, विपुल गोंधळी, तुकाराम कांबळे, चोखा गोंधळी, अरुण गोंधळी, सचिन कांबळे राजेंद्र कांबळे, मंगेश शिंगाडे, प्रमोद लोंढे, विशाल लोंढे व शिवाजी कांबळे यांनी अथक प्रयत्न केले.

या कार्यक्रमासाठी कोरेगावचे माजी सरपंच व्यंकट आबा पाटील, माजी उपसरपंच सगरेआण्णा पाटील, माजी उपसरपंच निवास पाटील, ग्रामपंचायत सर्व सदस्य, कोरेगावचे पोलीस पाटील दिलीप गावडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कारभारी पाटील, गजानन पाटील, संग्राम पाटील, वाहिद मुझावर, सेवानिवृत्त शिक्षक हंबीर आबा पाटील, सुरेश ( तात्या ) पाटील, आनंदराव परीट, विठ्ठल कुंभार, कोरेगावचे प्रगतशील शेतकरी संपतराव पाटील, नारायण दादा पाटील, उदयसिंह पाटील, मोहन मगदूम. ग्रामसेवक सुतार साहेब, महादेव अण्णा (चौगुले) पाटील व कोरेगावच्या विविध संस्थांचे व विविध राजकीय पक्षांचे विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन विजय कांबळे यांनी केले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link