हिंगोली जिल्हाधिकारी म्हणून राहुल गुप्ता यांनी स्वीकारला पदभार जिल्ह्यात कायम प्रयत्नशील राहणार :- नूतन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, संभाजी पुरीगोसावी (हिंगोली जिल्हा) प्रतिनिधी. हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांची अवघ्या सात महिन्यांत बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर नवा जिल्हाधिकारी कोण येणार…? याची नागरिकांना चांगलीच उत्सुकता लागून राहिली होती, जिल्हाधिकारी अभिनय गोयल हिंगोली जिल्ह्यात कायम प्रयत्नशील, राहिले मात्र त्यांच्या अचानक बदलीमुळे जिल्ह्यातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता, अखेर राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर येथील वीज कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून असणारे राहुल गुप्ता यांची हिंगोली जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली नूतन जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी हिंगोली जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे, राहुल गुप्ता हे इलेक्ट्रिकल इंजिनिअर इंजिनिअर असून सन 2017 मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे, गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे उपविभागीय अधिकारी तर धाराशिव जिल्हा परिषदेचे सलग तीन वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे, केंद्र व राज्य शासनांच्या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणीतून हिंगोली जिल्ह्याचा दर्जा उंचावण्यासाठी कायम प्रयत्नशील, राहणार असे नूतन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आढावा बैठकीत सांगितले, नूतन जिल्हाधिकारी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा नियोजन समिती सभागृहात सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली, यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश अप्पर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते, यावेळी गुप्ता म्हणाले शासनांच्या महत्त्वपूर्ण विविध योजनांचा वेळोवेळी आढावा घेण्यात येईल सर्व योजना राबविण्यासाठी सर्व विभाग प्रमुख यांच्याकडून चांगलेच काम होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
