अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
स्वातंत्र्य सैनिक पं.ध.थेपडे म्हसावद विद्यालयाची गौरवास्पद निवड
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे
गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव आयोजित “गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता २०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील ४६ शाळांची निवड करण्यात आलेली आहे. त्यात स्वातंत्र्य सैनिक पं.ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा समावेश आहे. शाळेसाठी, संस्थेसाठी आणि गावासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.*
*स्वातंत्र्य सैनिक पं. ध.थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावद तालुका जिल्हा जळगाव येथे अंतिम स्वच्छता मूल्यांकनासाठी आदरणीय गिरीश कुलकर्णी सर, सी डी पाटील सर यांनी विद्यालयात भेट देऊन शाळा आणि परिसर स्वच्छतेचे सर्वेक्षण केले. सदर प्रसंगी शाळेच्या विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने आदरणीय गिरीश कुलकर्णी आणि सी.डी. पाटील सर यांचे स्वागत केले. भेटी प्रसंगी अंतिम स्वच्छता मूल्यांकन परीक्षण अहवाल, नोंदणी अहवाल, शाळेत राबवलेले स्वच्छता विषयक विविध उपक्रमाविषयीचे बारकावे ,उपक्रमातील सहभागी विद्यार्थी, शिक्षक तसेच उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल याविषयीची चर्चा करून समितीने आनंद व्यक्त केला . मुलांमध्ये स्वच्छतेचे मूल्य तसेच स्वच्छतेचे संस्कार रुजवणे काळाची गरज आहे .तसेच आजचा विद्यार्थी हा उद्याच्या भारताचा भावी आधारस्तंभ आहे . विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरणविषयीची गोडी निर्माण होणे गरजेचे आहे. म्हणूनच अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात, असे आदरणीय गिरीश कुलकर्णी सरांनी आपल्या मनोगतात सांगितले. प्रसंगी पथनाट्यात सहभागी शाळेच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना अभिप्रेत असलेल्या स्वच्छतेवर आधारित पथनाट्याचे सादरीकरण केले. सादरीकरणात विद्यार्थ्यांची तळमळ आणि स्वच्छतेविषयी जनजागृतीचा उत्साह पाहून आदरणीय गिरीश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक पी डी चौधरी सर यांनी आदरणीय गिरीश कुलकर्णी आणि सी. डी. पाटील सर यांचा सत्कार करून संस्थेचे संस्थापक चेअरमन गांधीवादी कै. स्वातंत्र्य सैनिक पं. ध. थेपडे यांच्या जीवन चरित्रावर आधारित “कर्मयोगी” पुस्तक भेट दिले.विद्यालयातील शिक्षिका भगिनींनी औक्षण करून गिरीश कुलकर्णी आणि सी.डी.पाटील सरांना शुभेच्छा दिल्या. विचारमंचावर मुख्याध्यापक पी.डी. चौधरी,उपमुख्याध्यापक बच्छाव सर, पर्यवेक्षक के. पी.पाटील तसेच ज्येष्ठ शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.*
