सर्वसामान्य कुटुंबातील प्रियांका पाटलांची न्यायाधीश पदी निवड कराड तालुक्यांतील आटके गावचा मानाचा तुरा, संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. महाराष्ट्र लोकसेवा न्यायालयाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कराड तालुक्यांतील आटके गावच्या सुकन्या आणि माजी सैनिक बाजीराव गणपती पाटील यांची कन्या प्रियांका बाजीराव पाटील यांची दिवाणी न्याय कनिष्ठ स्तरांवर व प्रथम वर्ग न्याय अधिकारी पदी निवड झाली आहे, प्रियांका पाटील हिच्या नियुक्तीने आटके गावात प्रथमच मानाचा तुरा रोविला आहे, सर्वसामान्य कुटुंबातील आटके गावातील पहिल्यांदाच न्यायाधीश होण्याचा मान प्रियांका पाटील हिने मिळवला आहे, आपल्याला जिद्दीवर चिकाटी करुन परिश्रमाचे जोरावर प्रियांका पाटील यांनी चांगलेच यश मिळवले आहे, आपली मुलगी न्यायाधीश व्हावी असे आई-वडिलांचे स्वप्न देखील होते, मात्र प्रियांका पाटील हिने साक्षात ते स्वप्न पूर्णत्वास नेल्यामुळे आई-वडिलांचा चेहरा आनंदाने फुलला आहे, तिच्या यशाबद्दल गावकऱ्यांसह आई-वडिलांनी देखील आनंद उत्सव साजरा केला, परीक्षेसाठी पुणे येथे प्रियांकाने तयारी केली होती, अँड गणेश शिरसाट यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळाले, तिच्या या नियुक्तीबद्दल आणि भरारी यशाबद्दल पै.पाहुवणे नातेवाईक यांच्यासह कराड तालुक्यांसह परिसरांसह आटके गावातील ग्रामस्थ माता बहिणी देखील प्रियांका पाटील हिच्या निवडीबद्दल अभिनंदन चा वर्षाव होत आहे.
