मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभवी कलाकार आनंद बुरड यांना मलयाळम सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत काम करण्याची संधी
प्रतिनिधी -सारंग महाजन
मराठी चित्रपटसृष्टीत 2013 पासून कार्यरत असलेले आणि ‘उर्फी’, ‘ऑनलाइन बिनलाइन’ यांसारख्या 17 हून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारे कलाकार आनंद बुरड यांना आता मलयाळम सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची अनोखी संधी मिळाली आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री मालविका मोहनन देखील प्रमुख भूमिकेत आहेत.
मोहनलाल यांच्या आगामी ‘हृदयपूर्वम’ या चित्रपटासाठी आनंद बुरड यांची निवड झाली. नुकतेच त्यांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणात सहभाग घेतला. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना आनंद बुरड यांनी सांगितले की, त्यांची भूमिका खूपच छान आहे त्यांना मजेदार विनोदी प्रसंग साकारायला मिळाला आहे.
‘द मेल’, ‘तबकडी आणि ‘पिचकारी’ यांसारख्या त्यांच्या आगामी चित्रपटांच्या यादीत आता ‘हृदयपूर्वम’ ची भर पडली आहे. मोहनलाल यांच्यासारख्या मोठ्या कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने आनंद बुरड खूप आनंदित आहेत आणि या अनुभवाला ते त्यांच्या यशस्वी कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा मानतात.
