एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

भरारी पथकाच्या कारवाईत विदर्भात 28 कोटींच्या 3,470 वीज चोऱ्या उघडकीस

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात

प्रतिनिधी सतीश कडू नागपूर

भरारी पथकाच्या कारवाईत विदर्भात 28 कोटींच्या 3,470 वीज चोऱ्या उघडकीस

नागपूर, दि. 15 एप्रिल 2025: महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या अंतर्गत नागपूर प्रादेशिक विभागातील भरारी पथकांनी एप्रिल 2024 ते मार्च 2025 या आर्थिक वर्षात विदर्भातील 11 हजार 102 ग्राहकांच्या वीज जोडण्यांची तपासणी केली. यात 28 कोटी 44 लाख रुपये मुल्याच्या तब्बल 3 हजार 470 प्रत्यक्ष वीज चो-या उघड झाल्या.

या भरारी पथकांनी वीज चोरी करणाऱ्या विदर्भातील या ग्राहकांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 (सुधारित 2007) च्या कलम 135 अन्वये कारवाई केली. या कारवाईत 28 कोटी 44 लाख रुपयांच्या प्रत्यक्स वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आली. तसेच, विद्युत कायदा 2003 च्या कलम 126 अन्वये व इतर 1 हजार 788 प्रकरणांमध्ये 17 कोटी 79 लाख रुपयांची अनियमितता आढळली. या कालावधीत वीज चोरी आणि अनियमिततेपोटी एकूण 46 कोटी 24 लाख रुपये रकमेचे निर्धारण करण्यात आले आणि त्यापैकी 39 कोटी 89 लाख रुपये संबंधित ग्राहकांकडून वसूल करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, वीज चोरीची रक्कम न भरलेल्या ग्राहकांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये 288 वीज ग्राहकांवर वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यात अकोला परिमंडलात सर्वाधिक 15 कोटी 81 लाख रुपयांच्या 1 हजार 24 वीज चोऱ्या, 6 अनियमितता आणि 472 इतर प्रकरणे उघडकीस आली. यापैकी 14 कोटी 40 लाख रुपयांची वसुली झाली असून 93 वीज चोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्याकालोखाल नागपूर परिमंडलात 14 कोटी 14 लाख रुपयांच्या 815 वीज चोऱ्या, 41 अनियमितता आणि 261 इतर प्रकरणे उघडकीस आली. यापैकी 10 कोटी 5 लाख रुपयांची वसुली झाली असून 104 वीज चोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर अमरावती परिमंडलात 8 कोटी 77 लाख मूल्याच्या 675 वीज चोऱ्या, 7 अनियमितता आणि 505 इतर प्रकरणे उघडकीस आली. यापैकी 7 कोटी 77 लाख रुपये वसूल झाले असून 45 ग्राहकांवर वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले.

याशिवाय, चंद्रपूर परिमंडलात 4 कोटी 52 लाखांच्या 489 वीज चोऱ्या, 8 अनियमितता आणि 107 इतर प्रकरणे उघडकीस आली. यापैकी 4 कोटी 96 लाखांची वसुली झाली असून 18 ग्राहकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर गोंदीया परिमंडलात 2 कोटी 97 लाखांच्या 467 वीज चोऱ्या, 6 अनियमितता व 165 इतर प्रकरणे उघडकीस आली. यापैकी 2 कोटी 68 लाख रुपये वसूल झाले असून 28 ग्राहकांविरोधात वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले.

वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा व इतर सेवा देण्यासाठी महावितरण सतत प्रयत्नशील आहे. मात्र, वीज वितरण हानी व वीज चोरीमुळे महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान कमी करण्यासाठी महावितरणमध्ये सुरक्षा व अंमलबजावणी विभाग अविरतपणे कार्यरत आहे. कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी), मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर प्रादेशिक विभागात उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी), नागपूर यांच्या देखरेखेखाली विदर्भात मंडळ स्तरावर 12 व विभागीय स्तरावर 3 भरारी पथके तसेच नागपूर व अकोला येथे सुरक्षा व अंमलबजावणी परिमंडळ कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत विदर्भात सर्वत्र वीज चोरी विरोधात नियमितपणे कारवाई केली जाते. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा आणि कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) सौ. अर्पणा गिते (म.पो.से.), प्रादेशिक संचालक, नागपूर परिक्षेत्र परेश भाग्वत यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी), नागपूर परिक्षेत्र सुनील थापेकर तसेच सुरक्षा व अंमलबजावणी विभागातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी हे वीज चोरीमुळे होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.

वीज चोरी हा सामाजिक अपराध असून त्यामुळे वितरण कंपनी व समाजाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. त्यामुळे सर्व नागरिकांनी त्यांच्या परिसरात वीज चोरी होत असल्यास त्याबाबतची माहिती महावितरणच्या स्थानिक भरारी पथके, सुरक्षा व अंमलबजावणी कार्यालये किंवा जवळच्या महावितरणच्या कार्यालयास द्यावी, वीज चोरी प्रकरणाची माहिती देणाऱ्या व्यक्तीस महावितरणकडून योग्य ती बक्षीसाची रक्कम देण्यात येते. तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते, ग्राहकांनी अधिकृतपणे वीज पुरवठा घेऊन महावितरण कंपनीस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link