एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

बारामती हादरली…! तू माझ्याशी लग्न कर अन्यथा आई-वडिलांना संपवीन, अल्पवयीन अंकिताने अखेर आपलं आयुष्य संपविले

संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) बारामती हादरली…! तू माझ्याशी लग्न कर अन्यथा आई-वडिलांना संपवीन, अल्पवयीन अंकिताने अखेर आपलं आयुष्य संपविले, संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी. आपल्या स्वतःच्या आई-वडिलांना आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी बारामती तालुक्यांतील कोराळे खुर्द गावातील एका अल्पवयीन मुलीला स्वतःला संपवावे लागलंय, गावातीलच गुंडांच्या त्रासांला वैतागून तिने अखेर गळफास घेवुन आत्महत्या केली आहे, या घटनेनंतर वडगांव निंबाळकर पोलिसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, या सर्व घटनेमध्ये अल्पवयीन मुलीचा हकनाक बळी गेला आहे, बारामती तालुक्यातील कोराळे खुर्द येथील इयत्ता १० वी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझ्या आई-वडिलांना व कुटुंबाला कोयत्याने मारून टाकीन अशी धमकी देवुन तिला वारंवार त्रांस दिला जात होता, तिला शाळेत जात असताना रस्त्यावर अडवले जात होते चिडवले जात होते मात्र कित्येक महिने तिने हा त्रांस सहन केला, मात्र आपल्या आई-वडिलांना आणि कुटुंबाला ही माहिती दिली होती, वडिलांनी देखील त्या नराधमांना समजावून सांगितले होते, पण त्यांनी ऐकलं नाही अखेर त्या अल्पवयीन मुलीने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी मरण पत्करले आणि तिने मृत्यूला कवटाळलं, भेदरलेल्या या मुलीने अखेर 8 एप्रिल 2025 रोजी सकाळी घरातच गळफास घेवुन आत्महत्या केली आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला त्रांस होऊ नये आई-वडिलांना कोणी मारू नये या भावनेतून तिने आपलं जीवन संपवले, या घटनेमुळे बारामती परिसरांमध्ये आता हळहळ व्यक्त केली जात आहे, मुलीच्या वडिलांनी वडगांव निंबाळकर पोलीस ठाणेमध्ये आरोपी विशाल गावडे प्रवीण गावडे शुभम गावडे सुनील खोमणे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड करीत आहेत, विशेष म्हणजे राज्यांचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे, मुलींनी आणि मुलांना सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेऊ नये आणि आत्महत्येपर्यंत पाऊलं उचलू नका, त्या आई-वडिलांना काय वेदना होत असतात, हे जा त्या आई-वडिलांनाच माहीत असतं असं कोणी करत असेल तर ताबडतोब आमच्याशी संपर्क साधा प्रत्येकाला येथे सुरक्षित वाटलं पाहिजे अशा पद्धतीने आमची पोलीस यंत्रणा काम करीत आहे, पोलिसांना पायाभूत सुविधा पुरविण्याचे काम सरकार करीत आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link