अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
माणुसकी हाच खरा धर्म तो टिकवण ही काळाची गरज – डॉ. गणेश राऊत
संपादकीय
कोंढवे धावडे पुणे – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व महामानव युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस साहित्यरत्न डॉ. गणेश राऊत व ज्येष्ठ नागरिक राजाराम चव्हाण यांच्या हस्ते हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले…*
*या कार्यक्रमाचे आयोजन संघर्ष चारिटेबल ट्रस्ट व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते…*
*यावेळी बाबांचे अनमोल बोल माझा कुणाच्या धर्माला विरोध नाही, माझा कुणाच्या देवाला विरोध नाही, जितका तुम्हाला धर्म प्रिय आहे तितकाच धर्म मलाही प्रिय आहे, तुम्ही जातीय व्यवस्थेला धर्म मानता मी माणुसकीला धर्म मानतो तुम्ही दगडाला देव मानता मी जिवंत माणसाला देव मानतो, राज्यघटना लिहिताना जास्त कष्ट आले नाहीत कारण माझ्यासमोर छत्रपती शिवरायांचे स्वराज्य उभे होते या अनमोल शब्दांचे जतन करणे ही खरी काळाची गरज आहे असे मत यावेळी साहित्यरत्न डॉ. गणेश राऊत त्यांनी व्यक्त केले.
*या कार्यक्रमाला लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक श्रीकांत धावडे व्यवसायिक शिवाजी तात्या धावडे, सुधीर धावडे, सामाजिक कार्यकर्ते श्रीरंग गायकवाड, दादू गायकवाड, प्रशांत महाजन, प्रकाश गायकवाड, प्रतीक गायकवाड आदित्य वाकडकर, अश्विनी सेलविराज, नीलम यादव, व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
