संपादकीय जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने विविध शासकीय वृत्तपत्रांना शासकीय जाहिरातींचे वितरण केले जाते. त्यानंतर उपलब्ध अनुदानानुसार ही विहित नमुन्यातील जाहिरातीची देयके जिल्हा कोषागारात सादर केली जातात.
मागील वर्षी आणि तेच सातत्य ठेवून यावर्षी देखील मोठ्या संख्येने जाहिरातीची देयके आपले सर्वांचे स्नेही जिल्हा कोषागार अधिकारी श्री.महेशकुमार कारंडे साहेब,अप्पर कोषागार अधिकारी श्री.हिरवे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय कमी कालावधीत तत्परतेने पारित केली.
त्यांच्या या गौरवास्पद कामगिरीची दखल सर्वच प्रसारमाध्यमांनी घेतली आणि त्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात आभारपत्र देवून दैनिक महाराष्ट्र सम्राट चे संपादक गणेश भोईटे यांनी विशेष सत्कार केला.
जिल्हा कोषागार अधिकारी श्री.महेशकुमार कारंडे साहेब,अप्पर कोषागार अधिकारी श्री.हिरवे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार…!
