पुणे प्रतिनिधी : गोपाळ भालेराव
बुलढाणा जिल्ह्यातील समाजातील मुलगा व मुलीच्या प्रकरणातून झालेल्या वादातून अपहरण पर्यंत गेलेले प्रकरण हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये आले होते.
बुलढाणा जिल्ह्यातून विषय कळताच राष्ट्रीय बंजारा परिषचे प्रदेश प्रवक्ता अमोलभाऊ पवार व सामाजिक कार्यकर्त्या शिवकन्या राठोड हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये पोहचून प्रकरणात अटक झालेल्या बांधवांची भेट घेऊन त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. व विषय समजून घेतला बुलढाणा जिल्ह्यातून मुलगा व मुलगीने पुण्यात पळून येऊन लग्न केले ही घटना घडली.साहजिक आहे मुलीच्या घरातील किंवा नातेवाईकांनी मुलाच्या वडीलांना हिंजवडी येथे भेटून आमच्या मुलीला आणून द्या तुमच्या मुलाने पळून नेले आहे असां हट्ट धरून थोडी फार धक्का बुक्की करून गाडीत बसून चला आमच्या घरी मुलीला आणून द्या तरच तुम्हाला सोडतो असा प्रकार काहीसा घडला व हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. या प्रकरणात आठ दहा जण हिंजवडी पोलिस स्टेशन मध्ये अटक करण्यात आले व अपहरण चे गुन्हा नोंदवण्यात आले.काल राष्ट्रीय बंजारा परिषदचे प्रदेश महासचिव उमेशभाऊ राठोड ,व प्रदेश युवा सचिव श्रीकांतजी राठोड हे त्यांच्या नातेवाईकांन सोबत पुण्यात येऊन राष्ट्रीय बंजारा परिषदचे प्रदेश प्रवक्ता अमोलभाऊ पवार यांच्या सोबत पोलिस अधिकारी यांच्याशी भेटून सविस्तर चर्चा केली.व झालेल्या घटने बद्दल सत्य सागितले व दोन्ही परिवाराचे वाद मिटले पाहिजे या साठी आग्रह धरला व दोन्ही परिवाराचे राष्ट्रीय बंजारा परिषदच्या पदाधिकारी यांच्या प्रयत्ना मुळे वाद मिटला. पण झालेली घटना व त्यातून दाखल झालेले गुन्हे हे कोर्टातुनच मिळटवावे लागेल हेही सत्य नाकारता येत नाही म्हणून पुढील प्रकरण हे वकिलाच्या मदतीने सुरू आहे.या प्रकरणात लिहायचे कारण म्हणजे गोर बंजारा समाजाची संस्कृती इतिहास वैभवशाली परंपरा असलेला समाज आहे.मुळात बंजारा समाज हा कोर्ट कचेरी करणारा समाज नव्हे एक कष्ट करणारा प्रामाणिक असणारा लढाऊ समाज आहे.तांड्यातील वाद तांड्यातील नायक – कारभारी तांड्यातील पंच यांना घेऊन कुठलीही घटना असेल त्यातून मार्ग काढणारा समाज आहे.त्या मुळे पोलिस स्टेशन कोर्ट कचेरी कुठला ही विषय न जाता माझ्या पुण्यातील व तमाम बंजारा बांधवांना व भगिनींना विनंती आहे.आप आपसातील वाद असो किंवा घरातील वाद असो आपल्या घरातच मिटवा घरात मिटत नसेल तर आपल्या तांड्यातील नायक – कारभारी पंच यांच्या कडे प्रकरण घेऊन जावा पण समाजातील प्रकरण समाजातज मिटले पाहिजे याला महत्व द्या.! बाकी “जिथे विषय गंभीर तिथे राष्ट्रीय बंजारा परिषद खंबीर” समाजाच्या पाठीशी खंबीर पणे आम्ही उभे आहोत. “तुम्ही हाक द्या, आम्ही साथ देऊ”
वरील उल्लेख नुसार दोन्ही परिवाराला एकत्र आणण्यात यश आले असून राष्ट्रीय बंजारा परिषदचे प्रदेश प्रवक्ता अमोलभाऊ पवार यांनी सदैव समाजाच्या न्याय हक्क मिळून देण्यासाठी सदैव 24 तास समाजाच्या सेवेत असल्याचे बोलताना समाजातील वाद समाजातच नायक – कारभारी पंच यांच्या सल्याने मिटविले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.या वेळी राष्ट्रीय बंजारा परिषद प्रदेश महासचिव उमेशभाऊ राठोड, युवा प्रदेश सचिव श्रीकांतजी राठोड,आदेश जाधव व रोशन चव्हाण व समाज बांधव उपस्थित होते.
