प्रतिनिधी – हंसराज पाटील : देहूरोड बाजार पेठेतील २० ते १५ व्यापाऱ्यांकडून वर्गणीच्या नावाखाली खंडणी गोळा करणाऱ्या राजू मासलामनी पिल्ले उर्फ राजा पिल्ले याला देहूरोड पोलिसांनी अटक केली.आणि रविवार ( ता.१३ ) रोजी ज्या बाजार पेठेत त्याने दहशत निर्माण करून खंडणी उखळली त्याचा बाजार पेठेत देहूरोड पोलिसांनी त्याची धिंड काढली.
राजू मसलामनी पिल्ले उर्फ राजा पिल्ले वय -३५ ( रा मरिमाता मंदिरा जवळ गांधीनगर ) देहूरोड असे आरोपीचे नाव आहे.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,आरोपी राजा पिल्ले हा डॉ.बाबासाहेब आंबेकर जयंतीच्या नावाखाली कोणतेही मंडळ रजिस्टर नसताना ,कोणतेही अधिकार पत्र नसताना वर्गणी गोळा करीत होता.शनिवार ( ता.१२ ).रोजी दुपारच्या वेळी राजा पिल्ले हा बाजार पेठेत असलेल्या कुंदन साडी सेंटर व कुंदन ड्रेसेस या कपड्याच्या दुकानात गेला.त्या ठिकाणी दोन्ही दुकानात प्रत्येकी ५०१ रुपये या प्रमाणे दोन पावत्या दिल्या.यावर प्रशांत अमृतलाल कटारिया व अरविंद कटारिया यांनी त्यास सांगितले की दोन्ही दुकाने एकच आहेत ,५०१ रुपये घेऊन जा असे सांगून राजू पिल्ले यास जाण्यास सांगितले .
तुम्हाला संपवून टाकीन राजा पिल्लेने दिली धमकी
राजा पिल्ले यास ५०१ रुपये देऊन जाण्यास सांगितले असता ,राजा पिल्ले याने अरविंद कटारिया यांना मला १००० हजार रुपये दिले नाहीत तर तुम्हाला येथे धंदा करणे मुस्किल करून टाकीन ,तसेच कायमचे तुम्हाला संपवून टाकीन अशी जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी सर्व व्यापाऱ्यांनी विचार विनिमय करून देहूरोड पोलीस ठाण्यात प्रशांत अमृतलाल कटारिया ( रा.मेन बाजार पेठ ,देहूरोड ) यांनी रविवार ( ता.१३ ) रोजी तक्रार दाखल केली.
या तक्रारीनुसार देहूरोड पोलिसांनी राजा पिल्ले ( रा मरिमाता मंदिर शेजारी ,गांधीनगर) देहूरोड याला अटक केली.त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता ,त्याने कोणतेही रजिस्ट मंडळ नसताना ,कोणतेही अधिकार पत्र नसताना देहूरोड बाजार पेठेतील वीस ते पंचवीस व्यवसायिकांना अशाच प्रकारे धमकी देऊन खंडणी स्वरूपात पैसे उखळले असल्याचे उघडकीस आले.राजा पिल्ले या खंडणी खोराची देहूरोड बाजार पेठेतून धिंड कडण्यात आल्याने देहूरोड मधील व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
व्यापाऱ्यांनी न घाबरता तक्रार करावी
कोणतेही रजिस्टर मंडळ नसताना ,कोणतेही अधिकार पत्र नसताना ,कोणी वर्गणीच्या नावाखाली खंडणीच्या नावाखाली पैसे उखळत असेल तर अशा प्रकारा विषयी देहूरोड पोलिस स्टेशनला न घाबरता तक्रार करावी ,देहूरोड पोलिस स्टेशन कडून आशा खंडणी खोरांच्या विरुद्ध कडक कारवाई केली जाईल. – विक्रम बनसोडे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ,देहूरोड पोलिस स्टेशन
परिमंडल – २ चे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड ,सहायक पोलिस आयुक्त देहूरोड विभाग बाळासाहेब कोपनार ,यांच्या मतगदर्शनाखाली ,देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे. पोलिस उप निरीक्षक सावनकुमार वाघमारे ,लखनकुमार वाव्हळे , पोलीस हवालदार ,प्रवीण माने ,बाळासाहेब विधाते ,पोलिस शिपाई युवराज माने , संतोष महाडीक ,यांनी सदरची कामगिरी केली.
वर्गणी प्रकरणी धमकावल्याने एका एका व्यवसायिकाचा हृदय विकाराने मृत्यू ?
राजा पिल्ले हा वर्गणी मागण्यासाठी गेला असता , त्याने धमकी दिल्याने एका व्यायिकाला हृदय विकाराचा झटका आल्याने , त्या व्यवसायिकाचा मृत्यू झाला.या प्रकरणी संबधित मृत व्यापाऱ्याच्या नातेवाईकांनी देहूरोड पोलिस ठाण्यात राजा पिल्ले याच्या विरुद्ध तक्रार दिली.मात्र या बाबतीत पुढील तपास सुरू आहे , तपासा नंतरच काय प्रकार घडला ते निष्पन्न होईल.या बाबतीत आम्ही तपास करीत आहोत.
विक्रम बनसोडे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ,देहूरोड पोलिस स्टेशन.








