अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी-किशोर रमाकांत गुडेकर
दिनांक :-११ एप्रिल २०२५ -भारतातील स्त्रि शिक्षणाचे प्रणेते महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले ज्योतीबाराव गोविंदराव फुले यांचा जन्म कटगुण तालुका खटाव जिल्हा सातारा या गांवी 11 एप्रिल 1827 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नांव गोविंदराव शेरीबा गोऱ्हे असे होते तर आईचे नांव चिमनाबाई असे होते. ज्योतिबाचे आजोबा शेरीबा गोऱ्हे हे माधवराव पेशवे यांच्या दरबारात सजावटीचे कामकाज करत असत. या साठी माधवराव पेशवे यांनी त्यांना 35 एकर जमीन फुलांच्या व्यवसाया साठी दिली होती.या नंतर फुलांच्या व्यवसाया मुळे गोऱ्हे घराण्याला फुले म्हणुन ओळखले जाऊ लागले.आजोबा च्या मृत्य नंतर त्यांचे काका रानोजींनी ही जमीन हडप केली.त्या नंतर ज्योतिबारावचे वडील गोविंदराव हे भाजीपाल्याचा व्यवसाय करू लागले.ज्योतीबाराव केवळ नऊ महिन्याचे तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. ज्योतीबाराव यांचे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातुन पंतोजी शाळेत झाले.ज्योतिबा राव यांचा विवाह 12 व्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला.ई. सं. 1842 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी पुढील माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी माध्यमात त्यांनी प्रवेश घेतला. अतिशय चाणक्ष तल्लख बुद्धीमुळे पाच सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पुर्ण केला.ज्योतीबा रावाना मराठी, इंग्रजी उर्दू कन्नड, तामिळ, गुजराती ईत्यादि भाषा येत होत्या.
ज्योतिबाराव फुलेचे शैक्षणिक कार्य /योगदान – – अहमदनगर मिशनरी स्कुलच्या प्राचर्या मिस फरार यांच्या कडुन प्रेरणा घेऊन 3 ऑगस्ट 1848 रोजी ज्योतिबा रावांनी पुण्यात बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडेच्या
वाड्यात भारतातील पाहिली मुलींची शाळा सुरु केली.पहिल्या वर्षी या शाळेत फक्त 8 मुली उपस्थित होत्या.ज्योतिबा फुलेनी सावित्रीबाईना साक्षर करून भारतातील पाहिली स्त्री शिक्षिका व पाहिली प्रशिक्षित मुख्यध्यापिका बनविले. शुद्रासाठी शिक्षणाच्या कार्यामुळे झालेला विरोध बघुन ज्योतिबा फुलेना पत्नी सोबत गृहत्याग करावा लागला.त्यानंतर त्यांनी गुंजपेठ येथील उस्मान शेख यांच्या वाड्यात मुक्काम केला. 1850 ते 3 जुलै 1851 रोजी चिपळूणकराच्या वाड्यात मुलीची दुसरी शाळा काढली.17 सप्टेंबर 1851रोजी रास्ता पेठेत तिसरी मुलीची शाळा स्थापन केली.15मार्च 1852 रोजी वेताळ पेठेत भिडे यांच्या वाड्यात चौथी मुलीची शाळा सुरु केली. 1852साली नेटिव्ह फिमेल स्कूलं सभा पुना लायब्ररीची स्थापना केली.
19 मे 1852 रोजी ज्योतिबा फुलेनी वेताळ पेठेत अस्पृश्यासाठी भारतातील पहिली शाळा काढली.धुराजी चांभार व गणु शिवाजी मांग हे दलित शिक्षक प्रथम अध्यापणासाठी नेमले.यावेळी तत्यांचे सदाशिव गोवंडे, सखाराम परांजपे, विठ्ठल वाळवेकर, वामन प्रभाकर भावे, विनायक भांडारकर यांनीत्यांना मोलाची मदत केली. शैक्षणिक क्षेत्रातील महत्वपुर्ण कार्याबद्दल पुणे महाविद्यालयाचे (संद्याचे डेक्कन कॉलेज ) प्रा.मेजर थॉमसं कॅडी यांच्या अध्यक्षखाली पुण्याच्या विश्रामबाग वाड्यात सरकारी विद्या खात्या कडुन जाहीर सत्कार करण्यात आला होता. ज्योतिबा फुले यांनी आपल्या काही सहकारी मित्रांना सोबत घेऊन सप्टेंबर 1853 मध्ये महार, मांग, चांभार आदी लोकांना शिकविण्यासठी मंडळी नामक संस्था स्थापन केली.तर 1855 मध्ये प्रोढासाठी देशातील पहिली रात शाळा त्यांनी स्थापन केली.
28जानेवारी 1863 रोजी पुणे येथील आपल्या राहत्या घरी भारतातल्या पहिल्या बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. त्यानंतर पंढरपुरातही अशा गृहाची स्थापना केली. पुणे येथील बालहत्या प्रतिबंधगृहात काशीबाई नातु महिलेने एका मुलाला जन्म दिला.8 मार्च 1864 रोजी गोखलेच्या बागेत विधवा पुर्नविवाह घडवून आणला.बालहत्या 1873 मध्ये प्रतिबंधगृहात जन्मलेल्या मुलाला दत्तक घेऊन त्यांचे नांव यशवंत ठेवले. हे जन्माला आधारित जात आणि वर्ण व्यवस्था नष्ट करण्याचे प्रतिक होते.हाच यशवंत नंतर डॉक्टर झाला. 1877 साली पुण्यातील धनकवाडी येथे दुष्काळ पीडित विद्यार्थी साठी कॅम्प उभारला.तसेच
हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना केली. 1882 साली भारतातील शिक्षण विषयक स्थापन करण्यात आलेल्या हंटर कमिशन समोर ज्योतिबानी साक्ष देऊन 12 वर्षा खालील मुलांन मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे. शिक्षक प्रशिक्षित असावे, शिक्षक बहुजनातील असावे . जीवनोपयोगी व्यवहारी शिक्षण द्यावे.आदिवासी जाती जमातीना शिक्षणात प्राधान्य शेतीचे व तांत्रिक शिक्षण द्यावे.शासनाने वसुल केलेल्या शेतकऱ्याची रक्कम हि शेतकऱ्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करावी. महाविद्यालयीन शिक्षण जीवनातील गरजा भागविणारे असावे.अशा महत्वपुर्ण मागण्याकेल्या. प्राथमिक शिक्षण मोफत, सार्वजनिक व सक्तीचे केले जावे. अशी मागणी करणारे ज्योतिबा फुले आशिया खंडातील पहिले शिक्षण तज्ञ् होते. ज्योतिबा फुले महान समाजसुधारक होते.त्यांनी सामाजिक न्यायासाठी आणि शिक्षणासाठी महत्वाचे कार्य केले.अस्पृश्यता आणि जाती व्यवस्थेला विरोध केला. स्त्रिया आणि मागासलेल्या लोकांसाठी शिक्षण आणि समान्य हक्का साठी लढा दिला.तसेच सत्यशोधक समाजाची स्थपना केली.ज्याचा उद्देश समाजातील अंधश्रद्धा आणि रूढीवादी विचारसरणी नष्ट करणे, सर्वाना सामान अधिकार मिळवुन देणे हा होता.त्यांनी मागासलेल्या व शोषितासाठी कार्य केले.त्यांना शिक्षण व समान संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.त्योतिबा फुले यांनी विधवा पुंर्नविवाहाचे समर्पण केले.बाल विवाह सती प्रथेसारख्या सामाजिक समस्या विरुद्ध आवाज उठविला ज्योतिबा फुले यांनी ” गुलामगिरी ‘ या पुस्तकात गुलामगिरी आणि सामाजिक विषमतेवर भाष्य केले. ज्योतिबा फुले यांनीच सर्व प्रथम भारतात व आशिया खंडात शिक्षण प्रसारासाठी महत्वाचे कार्य केले.ज्यात त्यांनी प्रथम दलित शिक्षक नियुक्त केले. यांनी सर्व स्तरातील लोकांसाठी शाळा उघडल्या. ज्योतिबा फुले हे मराठी लेखक, विचारवंत, समाजसुधारक होते.त्यांनी सत्य शोधक समाज संस्था स्थापन केली. शेतकरी व बहुजन समाज्याच्या समस्यानांना केंद्रस्थानी ठेवुन पुरोगामी विचाराची मांडणी केली.भारतात प्रथम महाराष्ट्र|तील स्त्रि शिक्षणाची मुहूर्थमेढ रोवली. महाराष्ट्र राज्यातील जनतेने सभेत 1888 मध्ये, त्यांना महात्मा हि उपाधी बहाल केली होती.महात्मा ज्योतिबा फुले वर थॉमस पेन यांच्या [The Right Of Man, Justice And Humanity, Comman Sense The Age Of Reason ] या पुस्तकाचा प्रभाव होता.
1895 साली ज्योतिबा फुले यांनी वयाच्या 28 व्या वर्षी पुण्यात ‘ तृतीय रत्न ‘ हे नाटक लिहले.हे ज्योतिबाचे पहिले पुस्तक व मराठीतील पहिले सामाजिक नाटक म्हणुन ओळखले जाते. महात्मा फुले यांनी लिहलेले ‘ सार्वजनिक सत्यधर्म ‘ हा सत्यर्शोधक समाज्याचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाज्याचे मुखपत्र म्हणुन ” दीनबंधू ” हे साप्ताहिक चालविले जात असे.संत तुकारामाच्या अभंगाच्या धर्तीवर त्यांनी अनेक ‘अखंड रचले. आपला ‘गुलामगिरी’ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीय यांना समर्पित केला. ‘अपृश्याची कैफियत ‘ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे.सार्वजनिक सत्यग्रंथ हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्य नंतर म्हणजे 1891 साली प्रकाशित झाला.अशा या स्त्रि शिक्षणाच्या प्रणेते महामानवास त्यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम! ” जय ज्योती जय क्रांती ” संकलन :- प्रा. संजय मोरे (अण्णा ) यांचे सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात गौरवणीय कार्य असुन ते अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष / मानव अधिकार आंतरराष्ट्रीय फेडरेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष् / सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष् पदावर कार्यरत आहेत. भ्रमणध्वनी 7058201111 9527322732 सिंगनुर ता. रावेर जि. जळगांव ( महाराष्ट्र )
