अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी हंसराज पाटील पुणे
श्री क्षेत्र देहू पुणे: कै. लक्ष्मीबाई अण्णाराव पाटील हे लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील नागलगाव येथील “समाज विभूषित व्यक्तित्व होऊन गेले” यांचे बालपण खूप कठिण प्रसंगातून गेले. हिच आठवण ठेवून यांनी जाती, पाती पलीकडे जाऊन समाजातील गरजू लोकांना जीवनाच्या शेवट पर्यंत मदत करीत राहिले. दुष्काळ परिस्थिती असो किंवा, नैसर्गिक आपत्ती वेळेस सर्वांच्या मदतीला धाऊन जाणारे. कुणालाही नाही म्हणणार नाही मदत करणे हाच यांचा स्वभाव होता.
एका दलीत कुटुंबातील हुशार मुलाला शिक्षणासाठी स्वतःच्या मुलासोबत ठेऊन, त्यांच्या खाण्या.
पीण्यापासून ते सर्व गरजेपर्यंत सर्वतोपरी मदत करून. एका गरीब कुटुंबातील मुलाला लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बनवले ” जिल्हाधिकारी गणपती कांबळे साहेब “नावाने परिचित झाले
हे उपकार कांबळे साहेब यांनी जीवन भर जपले, पाटील कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना ते आपले मानले. वेळोवेळी त्यांनी जाणीव ठेवून पाटील कुटुंबाला सहकार्य केलं. मला सुद्धा माझ्या आजीसोबत साहेबाना भेटण्याचा योग आला. खूप साधी राहणी पण उच्च विचारांनी व्यापून भरलेली असे हे. व्यक्तीमत्व होऊन गेले त्यांच्या स्मृती ला प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने उजाळा देत आहोत.
शेकडो कुटुंबाला आपला आधार दिला. कुठल्याही कठीण प्रसंगी समाजासाठी धाऊन जाणे हे त्यांचा गुणधर्म होता.
आज त्यांचा वारसा घेऊन त्यांचे कुटुंबातील सदस्य सामाजिक, राजकीय, औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
पत्रकार हंसराज पाटील; यांना लहानपणापासून सामाजिक, धार्मिक तेची आवड त्यांनी निर्माण केली आज त्यांच्या आशीर्वादाने ते पुणे येथे सामाजिक कार्यात संलग्न असतात .
या पुण्यात्म्याला पाटील परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहून
कै. लक्ष्मीबाई अण्णाराव पाटील,
कै. अण्णाराव रामजी पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने विश्व कल्याण मानव सेवा संस्था श्री क्षेत्र देहू येथे फळ, फराळ, बिस्किटे यांचे वितरण करण्यात आले..
