अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
नवखंडेनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त पाईट येथे धावले ३५०बैलगाडे. बाळासाहेब शिवेकर; सुदाम कोळेकर यांचे बैलगाडे ठरले घाटाचा राजा.
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव
खेड पुणे.
राजगुरुनगर: पाईट (ता: खेड) येथे नवखंडेनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शैर्यतीत पहिल्या दिवशी बाळासाहेब दत्तात्रय शिवेकर ११.९ सेकंद तर दुसऱ्या दिवशी सुदाम निवृती कोळेकर ११:२३ सेकंदात येतं गाडे घाटाचा राजा किताबाचा मानकरी ठरले. यात्रेच्या निमित्तानं ग्रामस्थांनी एकत्र येत हारतुरे मांडवट हाळ्याची मिरवणूक काढत आर्पन केले.
संध्याकाळी मनोरंजनासाठी दत्ता महाडिक पुणेकर यांच्या लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम संपन्न झाला.
तर गुरुवारी (दि.१०) रोजी दुपारी ४ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोरील मैदानात लाल मातीतील कुस्त्यांचा जंगी आखाडा पार पडला. रोख स्वरुपात तर मानाची नवखंडेनाथ केसरी ही चांदीची गदा व बक्षिसे देण्यात आली.यावेळी मंदीर परिसरात खाद्यपदार्था सह विविध प्रकारची दुकाने थाटली होती. खेळणी पाळणे या सारखी दुकाने थाटली होती.
यात्रेच्या दरम्यान दोन दिवस सुरू असलेल्या बैलगाडा शर्यतीत सुमारे ३५० हून अधिक बैलगाडा मालकांनी सहभाग घेत बैलगाडे धावले.
फायनल शर्यतीत क्रमांक विभागून देण्यात आले.
पहिल्या दिवशी पायनल मध्येप्रथम क्रमांक बाळासाहेब दत्तात्रय शिवेकर, निलेश आण्णासाहेब वाळुंज व काळभैरवनाथ बैलगाडा संघटना करंजविहिरे,दुसरा क्रमांक संदीप भोकसे, साईनाथ भोकसे व शरद चोरघे बैलगाडा संघटना पंकज दौंडकर जुगलबंदी
यांच्या गाड्याने पटकवला.तिसरा क्रमांक अनिल डांगले, स्वर्गीय किसन हरी डांगले व ज्ञानेश्वर दामोदर गाडे यांच्या गाड्याने पटकवला. तर चौथा क्रमांक रुद्र दत्तात्रय गारगोटे, हौशीराम सातपुते व विवांश केतन महाले यांच्या गाड्याने पटकवला.
दुसऱ्या दिवशी फायनल मध्ये प्रथम क्रमांक सुदाम निवृती कोळेकर, मल्हारी शिवेकर व अशोक विट्ठलराव पचपिंड, काळभैरवनाथ बैलगाडा संघटना यांच्या गाड्याने पटकवला. दुसरा क्रमांक विश्वास शिवेकर, वेदांत अमोल सावंत, व हिंद केसरी मोरा ग्रुप यांच्या गाड्याने पटकवला. तिसरा क्रमांक बबन सावळेराम कदम व ज्ञानेश्वर संभाजी राळे यांच्या गाड्याने पटकवला. चौथा क्रमांक गणपत बाबुराव पोटवडे यांच्या गाड्याने पटकवला.
प्रथम क्रमांकात २४ गाडे पळाले दुसऱ्या क्रमांकात ७३ गाडे पळाले तर तिसऱ्या क्रमांकात ८५ गाडे पळाले. चौथ्या क्रमांकात २८ गाडे, पाचव्या क्रमांकात २२ गाडे पळाले.
यात्रा यशस्वी करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, गावातील सर्व तरुण मंडळे, पुणेकर, मुंबईकर, ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
“खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वात मोठी यात्रा पाईट येथे नवखंडेनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त भरते. यात्रेच्या निमित्ताने दोन दिवस बैलगाडा शर्यती असतात तर लाल मातीतील कुस्त्यांचे आयोजन केले जाते. चौथ्या दिवशी देवाची दंडवते असतात. तालुक्यातील सर्व ग्रामस्थ बैलगाडा प्रेमी, मल्ल या यात्रेत सहभागी होतात.”
या कुस्ती आखाड्याला विशेषता सामाजिक कार्यकर्ते श्री भगवान शेठ पोखरकर (शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी सभापती पंचायत समिती खेड, सदस्य जिल्हा नियोजन समिती पुणे) यांच्या हस्ते मानाची कुस्ती लावण्यात आली.
अतिशय आनंदी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली
