श्री गणधर वलय विधान महोत्सव व विश्व नवकार मंत्राच्या जयघोषात कासार शिरसी येथे भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी चंद्रशेखर केंगार
जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर आदिनाथ भगवान महावीर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त येथील जैन मंदिरात श्री गणधरवलय विधान महोत्सवासह बुधवार तारीख 9 रोजी विश्व नवकार दिनानिमित्त या मंत्राच्या जयघोषात भगवान महावीरांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त शहरातून भगवान महावीरांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली या शोभायात्रेत जल कुंभासह अनेक महिलांनी मोठा सहभाग नोंदला होता या जन्मोत्सवाची जलयात्रेने
सांगता करण्यात आली या निमित्य उपस्थित मान्यवरांचा मंदिर कृती समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी कासार शिरशी येथील आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात गुरुवार तारीख 10 रोजी महाराष्ट्र राज्य संन्मती सेवा दल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष जीवनदादा पाटील व थोर श्रावक प्रकाश चंद्रजी लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक धार्मिक कार्यक्रमासह भगवान महावीर जयंती महोत्सवाचे
आयोजन करण्यात आले होते यावेळी जीन पूजा व जीन भक्तीचे महत्व जीवन दादा पाटील यांनी विशद केले या समारंभास मध्य प्रदेशातील अजित भैया व कासार शिरसी येथील संदीप फुलचरे हे उपस्थित होते या निमित्त श्रावक नेमचंद भाऊचंद आग्रे व पार्श्वनाथ चंद्रकांत विजापूरे यांच्या वतीने महाप्रसाद व अल्पोपाराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ स्मिता दिपाली मोहोळकर लातूर व सुवर्णा व करुणा किवडे गुलबर्गा यांचे सह श्री दिगंबर जैन सिद्धांत प्रसारक मंडळ संन्मती सेवादलाचे सर्वश्री बाजीराव पाटील, माणिक पाटील, नागेंद्र लोखंडे, प्रफुल्ल पुनजे, किशोर देवसाळे यांचे सह विश्वनाथ कडतने, मनोज पाटील, बबलू पाटील, सचिन कडतने, किरण किवडे, पिंटू पाटील, सुरेश विजापुरे, विजय देशमाने, सागर देवसाळे, शैलेश आग्रे, सुमित देशमाने, सचिन लोखंडे, प्रेमचंद विजापुरे, आदी तरूण कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले
