लोकाधिकार संघाच्या माध्यमातून लोकाधिकारप्रमुख तथा हारंगूळ चे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे यांनी केलेल्या प्रयत्नाला यश.
लातूर प्रतिनिधी अमोल गोरे
हरंगुळ (बु.) वरवंटी शिवरस्ता कामासाठी ४० लाख रुपये मंजूर…
लातूर :- लातूर महानगरालगत असलेले हरंगुळ (बु.) गाव हे फार झपाट्याने विस्तारले जात आहे.
हरमूळ वरवंटी शिवरस्त्यालगत हरंगुळ च्या हद्दीत गोविंद नगर, गोपाळ नगर, सदाशिव नगर, विठ्ठल नगर, गायत्री नगर, गुरुमाऊली नगर, अशी वेगवेगळी नगरे वसलेली आहेत. मात्र कच्चा रस्ता असल्यामुळे पावसाळ्यात या भागातील लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असे. या भागातील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन हरंगुळ चे माजी सरपंच तथा लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी लोकाधिकार संघाच्या माध्यमातून हा रस्ता होण्यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून हा रस्ता मंजूर करून घेतला आहे.
या भागातील रहिवाशी महिला पुरुष नागरिक बंधू-भगिनींचा एक मोर्चा जिल्हा परिषदेवर घेऊन जाऊन तत्कालीन कार्यकारी अभियंता यांना घेरावही घातला होता. त्यानंतर या रस्त्याच्या कामाबाबत प्रशासनाने लक्ष घालून कामास मंजुरी दिली असून या कामासाठी ४० लाख रुपये मंजूर केले आहेत. लवकरच या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
हरंगुळ (बु.) वरवंटी शिवरस्ता मंजूर करून ४० लाख रुपये निधीस मंजुरी दिल्याबद्दल लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
व्यंकटराव पनाळे यांच्या प्रयत्नाला यश आल्याबद्दल या परिसरातील नागरिकांनी पनाळे यांचे अभिनंदन करून आभारी ही व्यक्त केले आहेत.
