संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) सबसे कातील लावण्यवंती गौतमी पाटील साताऱ्यात…! अँडवोकेट विक्रम पवारांकडून गौतमी पाटलांना निमंत्रित…! संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. सध्या महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यांतून आपल्या कलेतून चर्चेत असणाऱ्या सबसे कातील लावण्यवंती गौतमी ताई पाटील या आगळ्यावेगळ्या रूपाने तरुण वर्गाच्या आणि महिलांच्या चांगल्याच समोर आहेत, त्यांचा कार्यक्रम एखाद्या जिल्ह्यात किंवा तालुक्यांत असला की त्या ठिकाणी तरुण वर्ग आणि महिलांची तुफान गर्दी पाहायला मिळते, मात्र गौतमी पाटील यांचा कार्यक्रम म्हटले की परवानगी आणि पोलीस बंदोबस्त हा कार्यक्रम आयोजकांना नक्कीच पोलीस प्रशासनाकडून घ्यावा लागतो, त्यामुळेच त्या नेहमीच चर्चेत देखील आहेत. पाटलांचा बैलगाडा, पाहुवणं जेवला का! अर्ध्या रात्री असं सोडून जायचं नाही! सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम ! अशा गाण्याने त्या चांगल्याच फेमस देखील झाले आहेत, गौतमी पाटलांना सध्या चांगलीच मागणी होत आहे, बैलाचा वाढदिवस बाळाचा वाढदिवस पत्नीचा वाढदिवस यात्रा उत्सव अशा करावा कार्यक्रमांसाठी त्यांना विविध जिल्ह्यातून चांगलीच मागणी होत आहे, त्याच अनुषंगाने माननीय शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसांच्या अनुषंगाने अँडवोकेट विक्रम पवारांकडून गौतमी पाटलांना निमंत्रित करण्यात आले आहे, पण त्यांच्या कार्यक्रमाबद्दल अनेकांनी गौतमी पाटलांचा कार्यक्रम हा तात्काळ रद्द व्हावा असेही पोलीस प्रशासनाला निवेदन देखील दिले आहे, पण शेवटी सातारच्या राजघराण्याला सातारकरांना जपायचे आहे, त्यामुळे गौतमी पाटलांचा कार्यक्रम हा सातारा शेंद्रे या ठिकाणी 11 एप्रिल रोजी संपन्न होण्याची शक्यता आहे, पण लावण्यवंती गौतमी पाटील या नेहमीच पोलीस प्रशासनाकडून दिलेल्या नियमांचे पालन करून आपला कार्यक्रम संपन्न करतात, कार्यक्रमांमध्ये व्यत्य आला तर त्या जागीच कार्यक्रम थांबविण्यासाठी कार्यक्रम आयोजकांना विनंती करतात.
