*या कार्यशाळेतून विश्वस्तांनी सामाजिक बांधिलकी सांभाळावी*- धर्मदाय सह आयुक्त श्रीमती हिरा शेळके नांदेड -मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शासकीय कार्यालयासाठी १०० दिवसाच्या कृती आराखड्या बाबतच्या निर्देशानुसार आज विश्वस्तांची कार्यशाळा संपन्न झाली .या कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणात श्रीमती हिरा शेळके धर्मादाय सह आयुक्त विश्वस्तांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या विश्वस्तांनी सामाजिक बांधिलकी सांभावी. हा या कार्यशाळेचा उद्देश आहे .
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शासकीय कार्यालयासाठी १०० दिवसाचा कृति आराखडा बाबतच्या निर्देशानुसार तसेच अमोघ कलोती धर्मादाय आयुक्त मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मादाय सह आयुक्त नांदेड, धर्मदाय वकील संघ , पुरोगामी धर्मदाय वकील संघ व ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ नेहरूनगर नागलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वस्तांची कार्यशाळा संपन्न झाली. ही कार्यशाळा दुसरी असून ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपुरी नांदेड येथे आज दि. ५ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीमती हिरा शेळके धर्मादाय सह आयुक्त नांदेड या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विजय पवार हे होते. दीप प्रज्वलनानंतर प्रास्ताविकात श्रीमती ममता राखडे धर्मदाय उप आयुक्त म्हणाल्या या कार्यशाळेत आज विश्वस्तांसाठी विविध विषयावर माहिती दिली जाणार आहे. हे ज्ञान आज विश्वस्तांनी घ्यावे.ज्ञान कोणी हिरावून घेत नाही. त्यामुळे आज तुम्ही शिकून घ्या. प्रमुख अतिथी डॉ. विजय पवार यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले संस्थेत वाद करू नका त्यामुळे प्रगती होत नाही. असा सल्ला विश्वस्तांना या कार्यशाळेत दिला. अध्यक्षीय भाषणात श्रीमती हिरा शेळके म्हणाल्या संस्था ही समाजासाठी असते. या माध्यमातून गोरगरिबांना मदत करायची ही सामाजिक बांधिलकी सांभाळावी .ही कार्यशाळा दुसरी असून या कार्यशाळेतून विश्वस्तांनी आपण आपली जबाबदारी सांभाळावी व सामाजिक बांधिलकी सांभाळावी. शेवटी त्यांनी ‘माझ्या स्वातंत्र्य देशात’ या विषयावर आजच्या परिस्थितीवर समर्पक कविता सांगितली. यानंतर प्रमुख वक्त्यात सनदी लेखापाल मनोहर आयलाने म्हणाले संस्थेचा कारभार, संस्थेची संपत्ती कशी सांभाळावी व संस्थेने रोख व चेकचा व्यवहार कसा करावा यावर विस्तृत मार्गदर्शन केले. अॅड.जयंत गजभारे यांनी कलम ५० ए अन्वये अर्ज करण्याबाबत व ५० ए अंतर्गत केव्हा व कशासाठी अर्ज करावा याबाबत मार्गदर्शन केले. अॅड.चंद्रशेखर नरवाडे यांनी कलम ४१ ए अन्वये धर्मदाय आयुक्ताकडे निर्देश मागण्याची तरतुदीवर मार्गदर्शन केले .तर अॅड. व्यंकटेश भवर यांनी संस्थेची नोंदणी ऑनलाईन व धर्मादाय कार्यालया संबंधी कारभार ऑनलाईन कसा करायचा याची माहिती दिली. आजच्या कार्यक्रमाला विधिज्ञ व विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वैशाली चौधरी सह धर्मदाय आयुक्त यांनी सुरेखा करून कार्यक्रमात रंगत वाढवली .शेवटी आभार प्रदर्शन ॲड. रानवळकर यांनी केले. विश्वस्तांची कार्यशाळा उपयुक्त असून दरवर्षी घ्यावी. त्यामुळे विश्वस्तांना बरीच माहिती प्राप्त होते.अशी चर्चा विश्वस्तात होताना दिसून आली.
